29 C
Mumbai
Friday, August 21, 2026
घरविशेषराजस्थानात कॉक्रोचना लोकांनी पळवून पळवून गावाबाहेर हाकलले!

राजस्थानात कॉक्रोचना लोकांनी पळवून पळवून गावाबाहेर हाकलले!

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीवरून राडा

Google News Follow

Related

राजस्थानच्या जयपूरमध्ये सरकारी शाळेच्या पाहणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध करत घटनास्थळावरून पळवून लावल्याची घटना घडली. बगरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा गावातील सरकारी प्राथमिक शाळेची पाहणी करण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीचे कार्यकर्ते पोहोचले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीला स्थानिकांनी विरोध केला आणि शाळेबाहेर आंदोलन केले. कॉक्रोच पार्टीचे लोक तिथे आल्यावर त्यांच्यात आणि स्थानिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि नंतर स्थानिक त्यांच्या मागे लागले.

राजस्थानातील सरकारी शाळांमधील पायाभूत सुविधांची स्थिती आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीकडून ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवले जात आहे. याच अभियानाचा भाग म्हणून कॉक्रोच जनता पार्टीची टीम रामपुरा-कंवरपुरा येथील सरकारी प्राथमिक शाळेत पाहणीसाठी पोहोचली होती. कॉकरोच जनता पार्टीचे सहसंयोजक आशुतोष रांका हाही या शाळेला भेट देणार होता. मात्र, टीम गावात पोहोचताच काही स्थानिक नागरिकांनी त्याच्या उपस्थितीला विरोध केला. त्यानंतर वाद वाढला आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना शाळेच्या परिसरातून बाहेर जाण्यास भाग पाडण्यात आले. घटनास्थळी स्थानिकांनी आंदोलनही केले. तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. त्यातून कॉक्रोच पार्टीच्या गाड्यांच्या काचाही फुटल्या.

या घटनेनंतर आशुतोष रांका याने भाजपवर गंभीर आरोप केला. विरोध करणारे लोक स्थानिक गावकरी नसून भाजपने पाठवलेले ‘गुंड’ असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या पक्षाच्या सरकारी शाळांच्या पाहणीच्या अभियानात अडथळा आणण्यासाठी हा विरोध घडवून आणल्याचे रांका याने म्हटले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया देताना पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आशुतोष रांका आणि इतर काही कार्यकर्त्यांना मारहाण झाली असून त्यांना दुखापत झाली. काही वृत्तांनुसार, कॉकरोच जनता पार्टीच्या वाहनाच्या काचेचे नुकसान झाल्याचाही पक्षाकडून आरोप करण्यात आला आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

हे ही वाचा:

मस्क यांनी पुन्हा ठोठावले भारताचे दार; स्टारलिंकच्या ‘जेन-२’ साठी नव्याने अर्ज

अभ्यास न केल्याने शिक्षिकेने थप्पड मारली; ६ वर्षांचा मुलगा तिथेच गतप्राण

इम्रान खान तपासणीनंतर पुन्हा तुरुंगात रवाना

मुंबईत पाडकामादरम्यान क्रेन रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर कोसळली

स्थानिक नागरिकांनी कॉकरोच जनता पार्टीच्या अचानक केलेल्या शाळा पाहणीला आक्षेप घेतला. शाळेची स्थिती खराब असली तरी स्थानिक पातळीवर त्यावर तोडगा काढण्याऐवजी बाहेरून येऊन या प्रश्नाला राजकीय रंग दिला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या टीमला शाळेत प्रवेश देण्यास त्यांनी विरोध केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
328,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा