मागाठाणे ते गोरेगाव हा लोखंडवालामधून जाणारा १२० फुटी डीपी रोड आता लवकरच पूर्ण होणार असून सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात भाष्य करत रस्त्याचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी या डीपी रोडसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमदार अतुल भातखळकर यांनी विनंती केली होती. लोखंडवाला, गोरेगाव ते मागाठाणे हा डीपी रोड दोन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात येतील. यासंबंधी आमदार भातखळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले की, “वचनपूर्तीच्या दिशेने. लोखंडवाला, मागाठाणे ते गोरेगाव डीपी रोड हा माझ्या मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ज्याच्यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील त्यांच्या भाषणात अत्यंत शुभ संकेत दिले. दोन वर्षात हे काम पूर्ण होईल अशी घोषणा त्यांनी केली. सिंग इस्टेट भागातील रस्त्याचे काम महिन्याभरात पूर्ण होईल, पुढे क्रांतीनगर पर्यंतचा रस्ता येत्या दीड वर्षात होईल. तेथील रहिवाशांना ‘४० लाख रुपये किंवा घर’ असा पर्याय सरकारतर्फे देण्यात आला आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेली वनविभागाची परवानगी सुद्धा मिळाली आहे. देवा भाऊंनी काल सभागृहात केलेल्या त्यांच्या भाषणामध्ये या सर्विस रोडची नोंद घेतली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे यांच्यासोबत या रस्त्याच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची बैठक झाली होती. यावेळी झालेली चर्चा अत्यंत सकारात्मक होती. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता आता मार्गी लागतो आहे असे चित्र आहे.
वचनपूर्तीच्या दिशेने…
लोखंडवाला, मागाठाणे ते गोरेगाव डीपी रोड हा माझ्या मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ज्याच्यासाठी मी गेली अनेक वर्षे प्रयत्न करतोय. या संदर्भात मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातील त्यांच्या भाषणात अत्यंत शुभ संकेत दिले. दोन वर्षात हे काम… pic.twitter.com/Ccn7ou7H4Y— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 12, 2026
हे ही वाचा:
होर्मुझ सामुद्रधुनी भारतीय तेलवाहू जहाजांना खुली!
ट्रान्सपॉन्डर, स्वयंचलित प्रणाली बंद… होर्मुझ सामुद्रधुनी पार करत तेलवाहू जहाज मुंबईत!
विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी! पोलिसांकडून तपसणी सुरू
IT क्षेत्रात ‘मूनलायटिंग’चा वाढता ट्रेंड
आमदार अतुल भातखळकर यांनी सुरुवातीपासून डीपी रोड व्हावा, यासाठी प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एकत्रित भेटी या कामासाठी घडवून आणल्या. अनेक नियम, कायदा या सगळ्या चौकटीतून या रस्त्याच्या कामाला गती दिली होती. डीपी रोडमुळे अत्यंत सुटसुटीत, सहज ये-जा करता येणार आहे. यातून वेळेची बचत होणार आहेच शिवाय पेट्रोलचीही बचत होणार असल्याचे ते यापूर्वी म्हणाले होते.







