कोकण रेल्वे मार्गावर एखादी गाडी बंद पडली की, मागे येणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा होतो आणि प्रवाशांना काही तास ताटकळत राहावे लागते याचा अनुभव आता नवा राहिलेला नाही. सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेसचे इंजिन मंगळवारी असेच बंद पडले आणि त्या मागे येणाऱ्या गाड्यांना तासनतास तिष्ठत राहावे लागले.
रत्नागिरी करबुडे दरम्यान या तेजस गाडीचे बंद पडले आणि प्रवाशांच्या मनस्तापाला मर्यादा राहिली नाही. सावर्डे येथे मांडवी एक्स्प्रेस थांबली होती. तब्बल अडीच तास ही गाडी विलंबाने धावत होती. अकराच्या सुमारास ती खेडला पोहोचली पण तिथे तिला एक तास थांबावे लागले. नंतर ती सावर्डेला पुन्हा थांबली. त्यामुळे मुंबईत पोहोचायला तिला नेहमीपेक्षा तीन तास तरी वेळ लागणार हे स्पष्ट झाले. याबाबत मांडवी एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे रणजित दळवी यांनी न्यूज डंकाला सांगितले की, ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे करबुडे येथे गाडी बंद पडल्याचे आम्हाला कळले. पण त्यामुळे खेडला आणि पुढे सावर्डेला गाडी थांबली आणि त्यामुळे मुंबईत पोहोचण्यासाठी अडीच ते चार तास विलंब होणार हे स्पष्ट झाले. यावर रेल्वेकडून काहीतरी ठोस उपाययोजना कधी केली जाणार? तेजस एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.
हे ही वाचा:
देवभूमी द्वारकेतील सात बेटांवरील हडपलेली जमीन केली मुक्त!
फडणवीसांनी गडचिरोलीसाठी आणली भलीमोठी गुंतवणूक
सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, ६ दिवसानंतर घरी परतला!
महाकुंभ : नवव्या दिवशी सकाळी १५ लाख तर काल ५४ लाखांहून अधिक भक्तांनी केले स्नान!
इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या ठीक ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या. इंजिन नादुरुस्त झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एका तास खोळंबा झाला. शेवटी रत्नागिरी रेल्वे स्थानकातून नवीन इंजिन मागवण्यात येऊन तेजस एक्सप्रेस ही गाडी एका तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. तेजस या गाडीला दुसरे इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी पूर्ववत झाली. तेव्हा प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पावसाळ्याच्या दिवसातही दरड कोसळली की कोकणातील गाड्यांचे दुर्दैवाचे दशावतार सुरू होतात. ती दरड हटवेपर्यंत प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. यापेक्षा हा अनुभव वेगळा नव्हता अशी भावना काही प्रवाशांनी बोलून दाखविली.







