26 C
Mumbai
Friday, February 7, 2025
घरविशेषतुर्कीच्या स्की रिसॉर्टला भीषण आग, ६६ जणांचा मृत्यू!

तुर्कीच्या स्की रिसॉर्टला भीषण आग, ६६ जणांचा मृत्यू!

अनेक जण गंभीर जखमी 

Google News Follow

Related

उत्तर-पश्चिम तुर्कीमध्ये असलेल्या ‘स्की रिसॉर्ट हॉटेल’ला आग लागल्याने ६६ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपला जीव वाचवण्यासाठी अनेकांनी हॉटेलच्या खिडकीतून बाहेर उड्या मारल्या.

बोलू प्रांतातील कार्तलकाया रिसॉर्टमधील हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ही आग लागल्याचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी सांगितले. १२ मजली हॉटेलच्या रेस्टॉरंटच्या मजल्यावर मंगळवारी (२१ जानेवारी) पहाटे ३.३० च्या सुमारास लागलेली आग वेगाने इमारतीमध्ये पसरली. आगीची घटना घडली तेव्हा हॉटेलमध्ये २३४ पाहुणे उपस्थित होते. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

हे ही वाचा : 

तेजस एक्स्प्रेस बंद पडली; चाकरमान्यांना झाला प्रचंड मनस्ताप!

सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज, ६ दिवसानंतर घरी परतला!

फडणवीसांनी गडचिरोलीसाठी आणली भलीमोठी गुंतवणूक

उद्योगपती गौतम अदानी कुंभमेळ्यात सहभागी होत भाविकांना प्रसादाचे वाटप! 

आगीपासून वाचण्यासाठी वरच्या मजल्यावरील लोकांनी खाली येण्यासाठी बेडशीटचा वापर केला. तर काहींनी खिडकीतून बाहेर उड्या मारल्या. बोलूचे गव्हर्नर अब्दुलअजीझ आयदिन यांच्या म्हणण्यानुसार, खिडकीतून उड्या मारल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्री केमाल मेमिसोग्लू यांनी ५१ जण जखमी झाल्याची पुष्टी केली, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. गृहमंत्री अली येर्लिकाया यांनी या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आणि हा देशासाठी अत्यंत दुःखाचा क्षण असल्याचे म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
228,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा