महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काळी प्रचंड वाढलेला विखार कमी झाला असला तरी ताप मात्र वाढलेला दिसतोय. युती आणि आघाडीचे राजकारण हे कायम आडवे तिडवे असते. सगळे काही सुऱळीत असण्याची शक्यता कमीच. परंतु प्रत्येक निर्णयावरून लफडी व्हायला लागली तर कारभार चालावा तरी कसा? पालकमंत्री पदावरून रुसवे फुगवे आणि आदळआपट जोरात सुरू आहेत. रुसवे इतके वाढलेत की मंत्रायलातच एखादे कोपभवन व्हायला हवे अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसच्या दौऱ्यावर असताना हा तमाशा सुरू आहे हे विशेष.