26 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरविशेषमहाकुंभ : ८ व्या दिवशी २२ लाखांहून अधिक भाविकांची मेळ्याला भेट!

महाकुंभ : ८ व्या दिवशी २२ लाखांहून अधिक भाविकांची मेळ्याला भेट!

आगामी चार शाही स्नान असल्याने भाविकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

Google News Follow

Related

१३ जानेवारी पासून सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्याला देशभरातील लाखो भाविक भेट देत आहेत. देशासह परदेशातील नागरिकांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाकुंभ मेळ्याच्या आजच्या आठव्या दिवशी २२ लाखांहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. तर रविवारी (१९ जानेवारी) सातव्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५० लाखांहून अधिक भाविकांनी महाकुंभमेळ्याला भेट दिली.

आज (२० जानेवारी) सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार २२ लाखांहून अधिक भाविकांनी महाकुंभ मेळ्याला भेट दिली. यामध्ये १० लाख कल्पवासी आणि १२.७ लाख यात्रेकरूंनी पवित्र स्नान केले. १९ जानेवारीपर्यंत, महाकुंभ मेळ्यामध्ये ८२.६ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी संगम त्रिवेणीमध्ये स्नान केले. शहरात थंडी असूनही भाविक मोठ्या प्रमाणात मेळ्यात सामील होत आहेत.

हे ही वाचा : 

नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती

महाकुंभ २०२५: सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या १२ राज्यांच्या मंडपांची भाविकांना भुरळ

४७१ दिवसांच्या कैदेनंतर गाझामधून ‘त्या’ तिघी परतल्या!

अडगुळं मडगुळं ईव्हीएमच कडबुळं…

येत्या काही दिवसांत यात्रेकरूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे कारण मेळ्यातील प्रमुख चार मोठे शाही स्नान बाकी आहेत. पुढील प्रमुख स्नान तारखांमध्ये २९ जानेवारी (मौनी अमावस्या), ३ फेब्रुवारी (बसंत पंचमी), १२ फेब्रुवारी (माघी पौर्णिमा) आणि २६ फेब्रुवारी (महा शिवरात्री) यांचा समावेश होतो.

दरम्यान, रविवारी महाकुंभ मेळ्यात एक अनपेक्षित घटना घडली. तीन एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन मेळ्यातील गीता प्रेस कॅम्पमध्ये आग लागली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मुख्यमंत्र्यांशी बोलून घटनेनंतरच्या परिस्थितीची माहिती घेतली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा