30 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरविशेषकला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’

कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना ‘महाराष्ट्र भूषण’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Google News Follow

Related

ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांचा त्यांनी दिलेल्या कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारने याविषयी मोठी घोषणा केली आहे. २०२३ या वर्षीचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ अशोक सराफ यांना घोषित झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे.

ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ वर्षाचा मानाचा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदनही केलं आहे. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर आणि मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे. अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अशोक सराफ यांनी त्यांच्या सरळ अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्ती असलेल्या विविध भूमिकांमध्ये काम केले आहे.

अशोक सराफ यांचा जन्म ४ जून १९४७ रोजी मुंबईत झाला आणि त्यांचे बालपण मुंबईतचं गेले. अशोक सराफ हे १९६९ पासून चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी २५० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी १०० हून अधिक व्यावसायिकरित्या यशस्वी ठरले आहेत. विनोदी भूमिकांसाठी त्यांना विशेष ओळखले जाते. १९६९ मध्ये ‘जानकी’ या मराठी चित्रपटातून त्यांनी करिअरला सुरुवात केली. पुढे १९७० ते १९८० च्या दशकात त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांच्यासोबत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. अशी ही बनवाबनवी, आयत्या घरात घरोबा, बाळाचे बाप ब्रह्मचारी, भुताचा भाऊ, धूम धडका हे त्यांचे काही उल्लेखनीय मराठी चित्रपट आहेत.

हे ही वाचा: रामदेवबाबांचा मेणाचा पुतळा न्यूयॉर्कच्या म्युझियममध्ये बसणार अमेरिका संतापली; लवकरच इराणसमर्थक गटांवर हल्ले करणार राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला आलेल्या इमामांविरोधात निघाला फतवा! चंदीगढमध्ये ‘इंडी’गढ ढेपाळला, महापौरपद भाजपाकडे

अशोक सराफ यांनी विविध मराठी नाटके आणि हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःची अशी वेगळी छाप सोडली आहे. त्यांनी स्वत:चे प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले आहे. सध्या त्याचे व्यवस्थापन त्यांची पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ या करतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा