33 C
Mumbai
Tuesday, February 7, 2023
घरविशेषसिकंदर शेखच्या पराभवानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी

सिकंदर शेखच्या पराभवानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंचांना धमकी

कोथरूड पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल

Google News Follow

Related

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माती गटातील अंतिम लढतीत महेंद्र गायकवाड याला पंचांनी चुकीच्या पद्धतीने चार गुण दिले त्यामुळे पैलवान सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाला अशा भावना सोशल मीडियावरून व्यक्त करण्यांत आल्या आहेत. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान सिकंदर शेख यांच्या विरोधात चार गुण दिल्याने पंच मारूती सातव यांना धमकी देण्यात आली आहे.

मुंबई पोलिस दलातील शिपाई संग्राम कांबळे यांनी फोनवरून धमकी दिल्याची तक्रार पंच मारूती सातव यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या समिती अध्यक्षांकडे केली असून त्यांच्या तक्रारीनंतर समितीने पुण्यातील कोथरूड पोलिस ठाण्यात संग्राम कांबळे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. पोलिस शिपाई कांबळे आणि पंच सातव यांच्यातील फोन रेकॉर्डिग सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा झालं आहे. दरम्यान, पैलवान सिकंदर शेख यांनी संग्राम कांबळे यांना कोणतीही धमकी दिली नसल्याचे म्हटले आहे.

‘हे योग्य झाल का’ असा प्रश्न फक्त त्यांनी विचारला आहे, असं पैलवान सिकंदर शेखर यांनी म्हटल आहे. “माझ्यावर अन्याय झाला हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापुरात आणणार. टांग मारताना ज्या नियमाने गुण द्यायला पाहिजे तसं झालं नाही. व्हिडीओ सर्व बाजुंनी पाहू दिला नाही. कोच यांनी दाद मागितली पण त्यांना देखील काही बोलू दिलं नाही. संग्राम कांबळे यांनी कुणाला धमकी दिली नसून फक्त हे योग्य झालं आहे का असा प्रश्न केलाय, अस सिकंदर शेख यांनी म्हटले आहे. या कुस्तीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सिकंदर शेख याच्यावर अन्याय झाल्याची चर्चा सगळीकडे होत आहे.

हे ही वाचा:

मुंबईकरांना विक्रमी हुडह

शर्मिला ठाकरे यांची उर्फी प्रकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया

देशातील दहशतवादी घटनांमध्ये ७० टक्क्यांनी घट

भाजप मिशन २०२४ साठी रणनीती आखणार

काय आहे प्रकरण?

माती विभागातील सोलापूरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड यांच्यात उपांत्य सामना पार पडला होता. महेंद्र गायकवाडने दुसऱ्या फेरीत चार गुण मिळवत सिकंदर शेखवर ५-४ अशी आघाडी मिळवली . पण महेंद्र गायकवाडने लावलेली बाहेरील टांग असलेला डावसुद्धा व्यवस्थीत झाला नव्हता. मग महेंद्रला चार गुण कशाचे दिले गेले? अस प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. याचाच जाब विचारण्यासाठी संग्राम कांबळे यांनी थेट पंच मारुती सातव यांना फोनवरून धमकी दिल्याचा आरोप सातव यांनी त्यांच्यावर केला आहे.

सिकंदर शेखच म्हणणं काय ?

मी सोशल मीडियावरील सर्व प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. मी या प्रेमाबद्दल सर्वांचा आभारी आहे. त्यांना सर्वाना असं वाटतंय की मी महाराष्ट्र केसरी व्हायला हवं होतं. व्हिडीओ बघून अनेकांना धक्का बसला आहे. आज कुस्ती कळत नाही असं कुणी महाराष्ट्रात नाही, अन्याय झाला की नाही झाला याबद्दल तुम्ही सोशल मीडियावर पाहू शकता. मी सर्वांना आवाहन करतो की आपलं प्रेम असच कायम असू द्या. तुम्ही माझ्यासाठी लढलात मी आश्वासन देतो की नक्की महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेन, असंही सिकंदर म्हणाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,909चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा