27 C
Mumbai
Sunday, January 29, 2023
घरराजकारणशर्मिला ठाकरे यांची उर्फी प्रकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया

शर्मिला ठाकरे यांची उर्फी प्रकरणावर एका वाक्यात प्रतिक्रिया

अधिक बोलणं टाळलं

Google News Follow

Related

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उर्फी जावेद हिच्या कपड्यांबाबत आणि तिच्या स्टाईलवर अगदी थोडक्यात भाष्य केले आहे. पनवेल येथील कार्यक्रमात पत्रकारांनी उर्फी प्रकरणावर त्यांना छेडले असता त्या म्हणाल्या,”मी पूर्ण कपड्यात फिरते बाकीच्यांचे मला माहित नाही”अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून आणि तिच्या विचित्र फॅशनवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहेच उर्फी जावेद विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली असून या तक्रारीनंतर अंबोली पोलिसांनी उर्फीला पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते आणि तिची चौकशीही केली.

मात्र या सगळ्यानंतर उर्फीला काही शांत बसवेना. माझ्या जिवाला धोका असल्याचे सांगत उर्फीने चित्रा वाघ यांच्याच विरोधात राज्य महिला आयोगाचे दार ठोठावले आणि तक्रार अर्ज दाखल केला. उर्फी जावेद प्रकरणात काही राजकीय मंडळींनी उडी घेतल्याचे पाहायला मिळाले.

हे ही वाचा:

पाकिस्तानचे राजकीय विश्लेषक मोदींच्या प्रेमात; भारताच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक

काँग्रेसच्या सुधीर तांबे यांचे पक्षातून निलंबन, उमेदवारी अर्ज न भरल्याची शिक्षा

प्रत्येक भारतीयाला आपल्या लष्कराचा अभिमान

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, कोणतीही इजा नाही

 

मात्र राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीदेखील उर्फी जावेदच्या कपड्यांबाबत आणि तिच्या स्टाईलवर भाष्य केले आहे. शर्मिला ठाकरे यांनी उर्फी जावेदवर बोलताना भाष्य करणं टाळलं पण तरीही त्यांनी एका वाक्यात यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
उर्फी प्रकरणावर चित्रा वाघ यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली होती. “मला यावर काहीही बोलायचं नाही. तिने कितीही काहीही लिहिलं, शब्दांची मोडतोड केली, मला काहीही बोलली तरी हा नंगानाच आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि यापुढेही राहिल.आमच्याकडे प्रत्येक रोगावर औषध आहे,”असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,917चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा