32 C
Mumbai
Wednesday, February 8, 2023
घरराजकारणसुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, कोणतीही इजा नाही

सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट, कोणतीही इजा नाही

मोठा अनर्थ टळला

Google News Follow

Related

पुण्यातील एका कार्यक्रमाचे उदघाटन करत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. टेबलावरील दिव्यामुळे साडीने पेट घेतल्याचं स्वतः सुप्रिया सुळे यांच्या वेळीच लक्षात आल्यान ही आग विझवण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यावेळी खासदार सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही.

कोणता होता कार्यक्रम

हिंजवडी परिसरातील एका कराटे कोचिंग क्लासेसचं आज उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी सुळे यांनी दीप प्रज्वलन केलं आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. मात्र महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना टेबलवरील दिवा त्यांच्या लक्षात आला नाही. दिव्यावरून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला हार अर्पण केला. त्यामुळे साडी दिव्याच्या संपर्कात आली आणि साडीने पेट घेतला. अचानक लागलेली ही आग कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने वेळीच विझवण्यात आली आणि मोठी दुर्घटना टळली.

हे ही वाचा:

गोवा गुटख्याच्या मालकासह दाऊदच्या तीन साथीदारांना १० वर्षांचा कारावास

कट्टरतावादी विचारसरणीच्या कैद्यांना स्वतंत्र बराकी

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती

एलएमएलचे इ-स्कूटरने कमबॅक

दरम्यान, या घटनेनंतरही सुप्रिया सुळे यांनी कार्यक्रमातून निघून न जाता तिथंच थांबणं पसंत केलं. तसंच खासदार सुळे यांचे दिवसभरातील सर्व पूर्वनियोजित कार्यक्रम होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

या दुर्घटनेनंतर मला कसलीही इजा झाली नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. “आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते पदाधिकारी यांना माझी विनंती आहे; की मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये.आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. सर्वांचे मनापासून आभार,” अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,907चाहतेआवड दर्शवा
2,001अनुयायीअनुकरण करा
61,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा