30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरविशेषशिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट

शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट

प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपये मिळणार असल्याची माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे.

Google News Follow

Related

शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील किमान २३ लाख शेतकरी नियमित कर्जदार आहेत. या शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहेत. प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपये मिळणार असल्याची माहिती एका वेबसाईटने जाहीर केली आहे. ८ लाख २९ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे.

शिंदे फडणवीस सरकारने आता २०१७-२०१८, २०१८-२०१९ आणि २०१९-२०२० या तीन वर्षांतील कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची परतफेड केलेल्यांना हा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम बॅंकांनी कर्जापोटी वर्ग करून घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या बचत खात्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे. शेतकऱ्यांना जवळपास १२ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. अडचणीतील जिल्हा बॅंकांचीही थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर या जिल्हा बॅंकांना सर्वाधिक रक्कम मिळणार आहे.

महाराष्ट्रात २३ लाख १४ हजार शेतकरी प्रत्येकवर्षी कर्ज घेतात. विशेष म्हणजे त्यांनी तीन टप्प्यात प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपये मिळणार आहेत. दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या आधार कार्डची खात्री झाल्यानंतर १८ ऑक्टोबरपासून पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहे. त्यामुळे १४ लाख ८५ शेतकऱ्यांना नोव्हेंबरमध्ये अनुदान मिळणार आहे.

हे ही वाचा:

कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू

INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह

हॅरी पॉटरमधील ‘हॅग्रिड’ काळाच्या पडद्याआड

दरम्यान, राज्यात महापूर, अतिवृष्टी, दुष्काळ आणि नैसर्गिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ठाकरे सरकारकडून कोणत्याही शेतकऱ्याला हे अनुदान मिळाले नाही. परंतु शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचे अनुदान जाहीर केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा