26 C
Mumbai
Tuesday, September 28, 2021
घरविशेषपॅरालिम्पिक २०२०: मनीष, सिंघराजचा पदकावर अचूक नेम

पॅरालिम्पिक २०२०: मनीष, सिंघराजचा पदकावर अचूक नेम

Related

टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताच्या नावे आणखीन दोन पदकांची कमाई झाली आहे. मिक्स ५० मीटर पिस्तुल या नेमबाजी क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत भारताच्या मनीष नरवालने सुवर्णपदक कमावले आहे. तर सिंघराजने रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे.

टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताचा बोलबाला हा सुरूच आहे. शनिवार, ४ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारतासाठी टोकियो मधून चांगली बातमी आली आहे. पुरुषांच्या मिक्स ५० मीटर पिस्तूल या नेमबाजी क्रीडा प्रकारात भारताने आणखीन दोन पदके आपल्या नावे केली आहेत. भारतीय पॅरा नेमबाज मनीष नरवाल आणि सिंघराज या दोघांनी सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवत भारतीयांना एक गोड भेट दिली आहे.

मनीष नरवाल याने २१८.२ गुणांची कमाई करत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. हा एक पॅरालिम्पिक विक्रम ठरला आहे. तर त्याच्या पाठोपाठ सिंघराज याने २१६.७ गुणांची कमाई करत रौप्यपदक आपल्या नावे केले आहे. तर रशियाचा सर्जी मॅलीशेव हा कांस्य पदकाचा मानकरी ठरला आहे. त्याने १९६.८ गुणांची कमाई केली.

मनीष आणि सिंघराज यांच्या कामगिरीसाठी जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन केले आहे. ‘मनीष नरवालचे सुवर्णपदक जिंकले हा भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी अतिशय खास क्षण आहे’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. तर ‘सिंघराजने भारतासाठी पुन्हा एकदा मेडलची कमाई करून दाखवली. त्याच्या या कामगिरीमुळे भारत आनंदी आहे’ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,414अनुयायीअनुकरण करा
3,610सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा