28.2 C
Mumbai
Friday, August 14, 2026
घरविशेषविलेपार्ल्यात ११व्या मजल्यावरील दोन फ्लॅटला भीषण आग; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

विलेपार्ल्यात ११व्या मजल्यावरील दोन फ्लॅटला भीषण आग; चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू

सहा जण जखमी; अग्निशमन दलाच्या जवानांसह चौघांची प्रकृती स्थिर

Google News Follow

Related

विलेपार्ले पश्चिम येथील बॅप्टिस्टा रोडवरील शांता भवन इमारतीच्या ११ व्या मजल्यावरील दोन फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह दोन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये आग विझविताना जखमी झालेल्या दोन अग्निशमन दलाच्या जवानांचाही समावेश आहे.

चर्च रोडवरील सेंट झेवियर शाळेजवळ असलेल्या शांता भवन इमारतीच्या ११व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११०१ आणि ११०२ मध्ये रात्री सुमारे १०.०२ वाजता आग लागली. आगीने सुमारे चार हजार चौरस फूट परिसर व्यापला होता. इलेक्ट्रिकल वायरिंग, विद्युत उपकरणे, एसी युनिट, घरातील साहित्य, सोफा, पलंग, फॉल्स सीलिंग, स्वयंपाकघरातील भांडी तसेच अन्य वस्तूंनी पेट घेतल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, वीज विभागाचे अधिकारी, १०८ रुग्णवाहिका तसेच महापालिका वॉर्ड कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासोबतच अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. रात्री सुमारे १२.२५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, तर रात्री एकच्या सुमारास आग पूर्णपणे विझविण्यात आली.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या आठ जणांना उपचारासाठी कूपर आणि नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कूपर रुग्णालयात दाखल केलेल्या अग्निशमन दलाचे जवान मनोज सोनावणे (३०) आणि शिवम द्विवेदी (२९) यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले. आग विझविण्यासाठी जात असताना सोनावणे जखमी झाले होते.

हे ही वाचा:

बँक लॉकर उघडला अन् धक्काच बसला; ५० लाखांचे दागिने गायब

घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळून दोघांचा मृत्यू

इंदिरा कँटीनच्या स्वयंपाकघरासह गोदामात अस्वच्छता; गोदाम सील, नमुने तपासणीला

राहुल गांधींच्या त्या विदेश दौऱ्यात कोण होते सोबत ? फोटो केला व्हायरल

दरम्यान, नानावटी रुग्णालयात सहा जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी अडीच वर्षांचा अबीर आणि २३ वर्षीय अंकिता यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर पार्थ (३२), हिरन (६४), यशस्वी आणि अभिषेक या चौघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, विद्युत वायरिंग किंवा उपकरणांमुळे आग लागली का, याचा तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
327,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा