मुंबईमधील अनेक ठिकाणी सध्या मेट्रोच्या मार्गिकेचे बांधकाम सुरू आहे. दरम्यान, मुंबईच्या चेंबूर भागात मेट्रोचे बांधकाम कोसळून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवार, ३१ जानेवारी रोजी पहाटे ही दुर्घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
चेंबूर भागात सध्या मेट्रोचे बांधकाम सुरू आहे. वडाळ्याकडे जाणाऱ्या या मेट्रोचे अर्थवट उभे असलेले बांधकाम अचानक शुक्रवारी पहाटे कोसळले. सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेजवळून मेट्रोचा मार्ग जातो. या मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याचे काम चालू आहे. सळई आणि काँक्रीटच्या सहाय्याने हे खांब उभारले जात असून यापैकी एक अर्धवट खांब सुमन नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आवारात कोसळला. हा खांब सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर आणि मोकळ्या जागेत कोसळला. सुदैवाने पहाटेच्या वेळी वर्दळ नसल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. २० फूट उंचीच्या सळया रोवून खांब उभारणीचं काम चालू होतं.
#WATCH | Mumbai, Maharashtra: An under-construction metro pillar collapsed in Chembur, Suman Nagar. No injury has been reported so far. More details awaited. pic.twitter.com/4cjx738U9z
— ANI (@ANI) January 30, 2025
हे ही वाचा :
जरांगे यांचे उपोषण अस्त्र आता म्यान, समोरासमोर लढाई करणार!
प्रयागराज: महाकुंभ परिसरात पुन्हा आग!
ही ‘तोंड पाटील’की बंद कधी होणार ?
अक्षय कुमारकडून पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर, म्हणाला-‘सल्ला आवडला’
या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि स्थानिक नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असून आता या दुर्घटनेमुळे मेट्रोच्या कामावर आणि दर्जावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. हे बांधकाम थोडं आजूबाजूला पडलं असतं किंवा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पडलं असतं तर फार मोठी जीवितहानी झाली असती. या दुर्घटनेमुळे शीव- ट्रॉम्बे रस्त्यावर काही काळासाठी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.