पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बात च्या १२५ व्या भागात देशवासियांना संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी देशवासीयांना गणेशोत्सव आणि आगामी सणांची शुभेच्छा दिली. तसेच स्वदेशी स्वीकारणे आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देणे यावर विशेष भर दिला. पंतप्रधानांच्या या संदेशाने नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि सणासुदीच्या काळात स्वदेशीबाबत जागरूकता वाढविण्याचे आवाहन झाले.
मोदी म्हणाले की सध्या देशभरात गणेशोत्सवाची धूम आहे आणि येत्या दिवसांत विविध सणांची रंगत वाढेल. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की या सणांमध्ये स्वदेशीला प्राधान्य द्या. त्यांनी सांगितले, “भेटवस्तू त्या असोत, ज्या भारतात तयार झाल्या आहेत; वस्त्र तेच असो, जे भारतात विणलेले आहे; सजावट तीच असो, जी भारतीय सामानाने केलेली आहे; आणि रोषणाई तीच असो, जी भारतात बनविलेल्या दिव्यांनी आणि झालरांनी केलेली आहे. जीवनातील प्रत्येक गरजेत स्वदेशी स्वीकारण्याचे आवाहन करताना त्यांनी म्हटले, अभिमानाने बोला, हे स्वदेशी आहे.” तसेच त्यांनी वोकल फॉर लोकल या मंत्राची पुनरावृत्ती करत आत्मनिर्भर भारत हा विकसित भारत घडविण्याचा एकमेव मार्ग असल्याचे सांगितले. मोदी म्हणाले, “स्वदेशी स्वीकारणे हे केवळ आर्थिक आत्मनिर्भरतेस चालना देत नाही, तर देशाची सांस्कृतिक ओळख अधिक बळकट करते.”
हेही वाचा..
उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी बीएसएफ जवानांसोबत ऐकली ‘मन की बात’
‘मन की बात’ कार्यक्रमातून जग प्रेरणा घेतंय
दिल्ली क्राइम ब्रांचने केले २ कोटींच्या ड्रग्स जप्त
मोदींनी सुवर्णपदक जिंकणाऱ्या रश्मिता आणि मोहसिनशी साधला संवाद
यासोबतच पंतप्रधानांनी स्वच्छता अभियानावर भर देत सांगितले की स्वच्छ भारत मिशन जन-जनापर्यंत पोहोचले पाहिजे. नागरिकांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखावी आणि हे अभियान एक जनआंदोलन बनवावे, असे त्यांनी आवाहन केले. मोदी म्हणाले की, “स्वच्छता आणि स्वदेशी हे आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे दोन मुख्य आधार आहेत.” त्यांनी विशेषतः युवकांना प्रेरणा घेण्याचे आणि या उद्दिष्टपूर्तीत योगदान देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर मन की बात चा एक छोटा व्हिडिओ शेअर करत लिहिले : “अभिमानाने बोला, हे स्वदेशी आहे.”







