30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषमरीन ड्राइव्ह वरून वरळीला जा अवघ्या आठ मिनिटांत , तेही टोलशिवाय.

मरीन ड्राइव्ह वरून वरळीला जा अवघ्या आठ मिनिटांत , तेही टोलशिवाय.

७० टक्के काम पूर्ण, १ नोव्हेंबरला रस्ता सुरू होण्याची शक्यता

Google News Follow

Related

मुंबईच्या पश्चिम समुद्रकिनारी बांधण्यात येत असलेल्या कोस्टल रोडचे काम पूर्ण होण्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. या नवीन कोस्टल रोडचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. १ नोव्हेंबरला हा रस्ता सुरू होण्याची शक्यता मुंबई महानगरपालिकेने व्यक्त केली आहे.

सुमारे १२,५०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या मुंबई कोस्टल रोडचा मरीन ड्राइव्ह ते वरळी पहिला टप्पा १०.५ किमीचा आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार या टप्प्याचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल.

हा रस्ता तयार झाल्यानंतर मरीन ड्राइव्ह ते वरळी हा प्रवास अवघ्या आठ मिनिटांत पूर्ण होणार आहे, तोही कोणत्याही टोलशिवाय. पहिला टप्पा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी-लिंक ते मरीन ड्राईव्हपर्यंत असेल. यात एक बोगदा, समुद्र ओलांडणारा रस्ता आणि समुद्रावर पूल असेल.

मरीन ड्राईव्ह ते प्रियदर्शनी पार्क हा प्रवास बोगद्यातून करावा लागणार आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन किलोमीटरचे दोन बोगदे असतील. यातील एकाचे पूर्णपणे खोदकाम झाले आहे, तर दुसऱ्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. प्रियदर्शनी पार्कपासून बोगद्यापासून मरीन ड्राइव्हपर्यंत रस्ता जाईल. म्हणजे इथून आत शिरलो तर काही मिनिटांत मरीन ड्राइव्हला पोहोचता येईल. म्हणजेच मलबार हिलसह इतर भाग जमिनीखालून जाणार आहे.

हे ही वाचा:

मद्य घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक

‘भगूर’ १५ दिवसात होणार पर्यटन स्थळ

काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलिंग, आणखी एक काश्मिरी पंडिताची हत्या

अजितदादा, ही पोटदुखी कशामुळे? शिंदे-फडणवीसांनी विचारला सवाल

बोगद्यानंतर समुद्र ओलांडून तयार होत असलेल्या रस्त्यावरून प्रवास सुरू होईल. महालक्ष्मी मंदिराच्या मागून जाणारा रस्ता हाजी अलीसमोरून वरळीकडे जाईल. हाजी अलीला लागूनच येथे मोठा इंटरचेंज आहे. म्हणजे या कोस्टल रोडवरून शहराबाहेर जाऊ शकतो किंवा कोस्टल रोडवर येऊ शकतो. अशा प्रकारचे मोठं इंटरचेंज बनविण्यात येत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा