28 C
Mumbai
Tuesday, March 28, 2023
घरविशेषमुंबईत येथे होतोय साडेपाच किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल

मुंबईत येथे होतोय साडेपाच किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचा पूल

मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्या

Google News Follow

Related

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरळीत व्हावा, यासाठी लवकरच तब्बल ५.५६ किलोमीटर लांबीचा पूल अर्थात उन्नत मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. या नवीन उन्नत पुलाच्या उभारणीसाठी मुंबई महानगरपालिकेने निविदा मागवल्या आहेत.

हा उन्नत मार्ग हा दक्षिण मुंबईतील पी. डिमेलो मार्गावरील ऑरेंज गेट नजिक सुरु होणा-या पूर्व मुक्तमार्ग येथून प्रस्तावित करण्यात आला असून तो ग्रँट रोड स्टेशन परिसरापर्यंत असणार आहे. पूर्व मुक्त मार्ग ते ग्रँटरोड स्टेशन परिसर या सुमारे ५.५६ किलोमीटर लांबीच्या अंतरासाठी सध्या ३० मिनिटे ते ५० मिनिटे एवढा कालावधी लागतो. मात्र, भविष्यात हे अंतर कापण्यासाठी उन्नत-मार्ग मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाल्यानंतर तेवढ्याच अंतरासाठी केवळ ६ ते ७ मिनिटे लागत आहे . ही गोष्ट लक्षात घेऊन दक्षिण मुंबईतील वाहतूक अधिक सुरळीत, सुलभ आणि वेगवान करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

या २० देशांतील नागरिक करू शकतील भारतात UPI द्वारे व्यवहार.. जाणून घ्या तपशील

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ.. हेरगिरी प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख

आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

इतका आहे खर्च
या कामासाठी ६६२.४२ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या मार्गाच्या उभारणीसाठी पावसाळ्यासह ४२ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

या भागातील वाहतूक कोंडी फ़ुटणार
दक्षिण मुंबईतील डॉ. बी. आर. आंबेडकर मार्ग, रफी अहमद किडवाई मार्ग, पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, पी. डिमेलो रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग , ग्रँट रोड परिसर, ताडदेव आणि मुंबई सेंट्रल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा