37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरविशेषमुस्लिम आता व्होट बँक राहिलेल्या नाहीत?

मुस्लिम आता व्होट बँक राहिलेल्या नाहीत?

भाजपच्या विजयाने विरोधी पक्षांचे गणित बिघडले

Google News Follow

Related

आताही देशातील निवडणुकीमध्ये मुस्लिम व्होट बँक महत्त्वाची आहे का? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मुस्लिमबहुल जागांवरून राजकीय पक्ष आकडेवारीत गुंतले आहेत. तर, मुस्लिम व्होट बँकेचे मिथक संपले आहे, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

भाजपने स्वतःच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या माध्यमातून मुसलमानांना आपलेसे करण्याची मोहीम राबवली आहे. मोदी सरकारने कशा प्रकारे कोणताही भेदभाव न करता केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना सर्व वर्गांतील लोकांपर्यंत पोहोचवल्या, हे पक्षातर्फे सांगितले जात आहे. या योजनेच्या लाभार्थींमुळे जी नवी व्होट बँक तयार झाली आहे, त्यामध्ये मतदारांच्या रूपात काही टक्के का असेना मुस्लिम समुदायाचाही समावेश आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. तसेच, कोणत्या मुद्द्यांच्या आधारे व जातीय समीकरण साधून मतदारांचे ध्रुवीकरण रोखले गेल्यास मुस्लिम मतदारांना भाजपविरोधी आघाडीत घेता येईल, या दृष्टीने विरोधी पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे.

हे ही वाचा:

‘मला किंग म्हणून हाक मारू नका’

मजुरांच्या कुटुंबीयांना जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रफिकचा हिंदूद्वेष जुनाच!

सिद्दीक कप्पननेच कपिल मिश्रा, परवेश वर्मा यांना मारण्यासाठी पीएफआय हिट पथकाला निर्देश दिले

आयपीएलच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ‘ठोको ताली’

देशभरातील सुमारे १०० मुस्लिमबहुल जागांवरील लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहिल्यास असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या ‘आता मुस्लिम व्होट बँक राहिलेली नाही,’ या मुद्द्यावर विश्वास ठेवावा लागेल. उत्तर प्रदेशातील अनेक जागांवर मुस्लिमांची लोकसंख्या निर्णायक असताना तिथेही भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे विरोधी पक्षांचे संपूर्ण गणितच बिघडले होते. आसाम, बंगालमध्येही मुस्लिमांची निर्णायक संख्या असूनही तिथे भाजपने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विरोधकांना त्यांच्या रणनितीमध्ये बदल करावा लागला आहे.

६५ टक्के जागांवर ३५ टक्के मुस्लिम मतदार
देशभरातील ६५ लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या ३५ टक्क्यांहून अधिक आहे. मुस्लिमबहुल ६५ लोकसभा जागांपैकी सर्वाधिक १४ जागा उत्तर प्रदेशात आहेत. १३ जागांसह पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, केरळमध्ये आठ, आसाममध्ये सात, जम्मू काश्मीरमध्ये पाच, बिहारमध्ये चार, मध्य प्रदेशात तीन आणि दिल्ली, गोवा, हरयाणा, महाराष्ट्र, तेलंगणामध्ये प्रत्येकी दोन जागा आहेत. तसेच, अन्य ३५ ते ४० टक्के लोकसभा मतदारसंघांतही मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र भाजपने अशा जागांवरही विजय मिळवला असल्याने मुस्लिमबहुल जागाही विरोधी पक्षांसाठी सुरक्षित राहिल्या नसल्याचे आढळून आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा