34 C
Mumbai
Thursday, October 29, 2026
घरविशेषहिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विश्लेषक अश्विन अघोर यांचे निधन

हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विश्लेषक अश्विन अघोर यांचे निधन

राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी विचारवंतांचे नुकसान

Google News Follow

आपल्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विचार परखडपणे मांडणारे अश्विन अघोर यांचे शुक्रवारी निधन झाले. ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्युमुळे हिंदुत्ववादी विचारांचा पुरस्कार करणाऱ्या परिवाराचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

आपल्या अस्खलित वऱ्हाडी भाषेत अघोर हे घनघोर हे यूट्युब चॅनेल चालवत असत. त्या माध्यमातून त्यांनी आपली सडेतोड मते व्यक्त केली होती. त्यांचा वेगळा प्रेक्षकवर्ग, श्रोतावर्ग तयार झाला होता. राजे हो, हे त्यांचे आवडते शब्द होते. तीच त्यांची ओळखही बनली होती.

न्यूज डंकासह भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी, अनय जोगळेकर, आबा माळकर या परिवाराचे अघोर हे एक सदस्य होते. त्यांच्या जाण्यामुळे या परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा:

अश्विनचे कसोटी क्रिकेटमध्ये ५०० विकेट्स

व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी यांचे निधन!

भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांची निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

काँग्रेसने आयकर भरला नाही, पण आरोप भाजपावर

अघोर यांना यकृताच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते या आजारातून बरे होतील अशी आशा डॉक्टरांनीही व्यक्त केली होती. त्यांच्यावरील उपचारासाठी हिंदुत्ववादी, राष्ट्रवादी विचारांच्या लोकांनी सढळहस्ते मदतही केली होती. मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीशी सर्वांच्या सदिच्छाही होत्या. मात्र नियतीपुढे त्यांचे काही चालू शकले नाही.

त्यांच्या अकाली जाण्याने हिंदुत्ववादी विचारांच्या एका मोठ्या वर्गाचे नुकसान झाले आहे अशी भावना व्यक्त करत अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा