28 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
घरविशेषकाँग्रेसने आयकर भरला नाही, पण आरोप भाजपावर

काँग्रेसने आयकर भरला नाही, पण आरोप भाजपावर

काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत बँक खाती गोठवल्याची दिली माहिती, पण वास्तव वेगळे

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची चार बँक खाती गोठविल्याचा आरोप केला आणि याला सर्वस्वी भाजपा जबाबदार असल्याचे विधान केले. लोकशाही भारतात शिल्लक राहिलेली नाही, असेही ते म्हणाले. त्याच दरम्यान आयकर विभागाच्या लवादाकडे सुरू असलेल्या सुनावणीनंतर काँग्रेस नेते विवेक तन्खा यांनी ही खाती पुन्हा सुरू झाल्याचे सांगितले. या सगळ्यात मूळ मुद्द्यांना बगल देण्याचा प्रयत्न करत काँग्रेसने सगळे खापर भाजपावर का फोडले असा आरोप केला जाऊ लागला.

काँग्रेसची चार खाती गोठवल्याचा आरोप माकन यांनी केलाच पण यामुळे लोकशाहीची हत्या झाली आहे. भाजपाला देशात एकच पक्ष ठेवायचा आहे, बाकी पक्ष संपवायचे आहेत, असे आरोप त्यांनी केले.

यानंतर काँग्रेस नेते विवेक तन्खा यांचेही स्पष्टीकरण आले. आयकर लवादासमोर ते उपस्थित होते. त्यांनी आपली बाजू मांडली त्यानंतर लवादाने ती खाती पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. तन्खा यांनी लवादाला सांगितले की, जर खाती बंद राहिली तर आम्ही निवडणुका लढवू शकत नाही.

हे ही वाचा:

व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अलेक्सी नवलनी यांचे निधन!

भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांची निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

शंभू सीमेवर उशिरा रात्री संघर्ष; निहंगला लागली रबरी गोळी

मुंबई विमानतळावर व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाचा मृत्यू!

 

२०१८-१९ मधील २१० कोटी रुपयांचा हा मुद्दा असून आयकर खात्याला हे पैसे काँग्रेसकडून येणे आहे. हेदेखील माकन यांनी सांगितले. पण इतकी वर्षे जुना हा मुद्दा आहे, आता २०२४ आहे असेही ते म्हणाले.

याच दरम्यान विविध सूत्रांच्या हवाल्याने हे सांगण्यात आले की, काँग्रेसने आयकर खात्याला १३५ कोटींचे देणे आहे. त्यातील १०३ कोटी हे करापोटी द्यायचे असून ३२ कोटी ही रक्कम त्याचे व्याज आहे. २०२१मध्ये काँग्रेसला आयकर खात्याने २१ कोटींची रक्कम देण्यास सांगितले पण त्यांनी अवघी ७८ लाख इतकीच रक्कम दिली. गेल्यावर्षी काँग्रेसने आयकर खात्याकडे १.७२ कोटी इतकी रक्कम भरली. मात्र अद्याप त्यांनी ही सगळी १३५ कोटी रक्कम भरलेली नाही. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा