28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरक्राईमनामाघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ दगावले; गुन्हा दाखल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत ८ दगावले; गुन्हा दाखल

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Google News Follow

Related

घाटकोपर छेडानगर येथे १०० फूट उंचीचे होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातात ८ जण मृत्युमुखी पडले असून ६६ जण जखमी झाले आहेत. मुंबईत सोमवारी संध्याकाळी वळवाचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे हे भलेमोठे होर्डिंग कोसळले. हे होर्डिंग तिथल्या पेट्रोल पंपवर कोसळल्यामुळे अनेक गाड्या आणि अनेक कर्मचारी त्याखाली दबले गेले.

दरम्यान, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलिसांनी जाहिरात एजन्सीचे मालक भावेश भिडे आणि इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

भादवी. कलम (३०४) सदोष मनुष्यवध, (३३८,३३७) मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे, (३४) एकापेक्षा अधिक आरोपी असणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या अपघातात ८ जण मृत्युमुखी पडले असल्याचे आणि ६६ लोक जखमी झाल्याचे म्हटले आहे. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला असून वाऱ्याच्या तडाख्यामुळे हे होर्डिंग कोसळल्याचे दिसते आहे. पण यात प्रचंड दिरंगाई झालेली असल्यामुळे यावर आता कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना लाज वाटायला हवी!

‘घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश’

‘पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्यांनी तिकडं जा, भीक मागून खा’

‘देशात एनडीए ४०० जागा जिंकण्याच्या मार्गावर!’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थिती माहीत करून घेतली आणि निर्देश दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा