लोकसभा निवडणुकीचा आज चौथा टप्पा पार पडत आहे.एकीकडे देशभरात मतदान सुरु आहेत तर दुसरीकडे पाचव्या टप्प्याकरिता पक्षांकडून प्रचार सभा सुरु आहेत.दरम्यान, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार टीका केली.तसेच वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानात निर्माण झालेली परिस्थिती यावर त्यांनी भाष्य केलं आहे.पाकिस्तानचे गुणगान गाणाऱ्यांनी खुशाल पाकीस्तानात जा, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले आहेत.
वाढत्या महागाईने पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.स्थानिकांनी सरकारच्या विरोधात निर्दर्शने करायला सुरुवात केली आहेत.अजूनही तशीच परीस्थिती आहे.दरम्यान, मुख्यमंत्री योगिनी यावर भाष्य केलं.पाकिस्तानपेक्षा भारतात परिस्थिती अधिकच चांगली असल्याचे ते म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
जपानला मागे टाकून भारत होणार चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था
पाकिस्तानच्या लष्करी बजेटपेक्षा, भारताची स्मार्टफोनची निर्यात जास्त
सुरक्षा दलाकडून गडचिरोलीत तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
जम्मू काश्मीरमधील पहिल्याच निवडणुकीला मतदारांच्या रांगा!
यूपी के सीएम योगी आदित्यनाथ ने कहा, "80 करोड़ लोग भारत में मुफ्त में राशन की सुविधा का लाभ प्राप्त कर रहे हैं… पाकिस्तान की आबादी 23 से 24 करोड़ है… पाकिस्तान में 1 किलो आटे के लिए मारपीट हो रही है…PoK में लगातार आंदोलन चल रहे हैं कि हमें भारत का हिस्सा बनाइए क्योंकि भारत… pic.twitter.com/URSlO6JQ2N
— ABP News (@ABPNews) May 13, 2024
मुख्यमंत्री योगी म्हणाले की, भारतात ८० कोटी लोकांना मोफत रेशन सुविधेचा लाभ मिळत आहे आणि पाकिस्तानची लोकसंख्या किती आहेत तर २३ ते २४ कोटी आहे.आजचा न्यूज पेपर वाचला, तर त्यामध्ये लिहून आले की, पाकिस्तानमध्ये १ किलो पिठासाठी हाणामारी होत आहे, याच गोष्टीवरून काल तिकडे दंगा झाला, कारण त्यांच्या देशात पीठ शिल्लक राहिलेले नाहीये.पाकव्याप्त काश्मीरमध्ये सारखेच आंदोलन होत आहे, ते म्हणत आहेत की आम्हाला सुद्धा भारताचा भाग बनवा.कारण भारतामध्ये पंतप्रधान मोदींचे शासन आहे आणि त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या शासनाखाली आम्ही आनंदाने राहू शकू.
ते पुढे म्हणाले की,जे पाकिस्तानचे गुणगान गात आहेत.या लोकांना सांगा की पाकिस्तानात जा, तिकडेच राहा, भीक मागा, उपाशी मरा, भारतासाठी ओझे बानू नका.कारण हे लोक भारतावर ओझे बनून भारताच्या प्रगतीच्या वाटेवर बॅरिकेट बनले आहेत, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले.