31 C
Mumbai
Saturday, May 25, 2024
घरसंपादकीयबीडमध्ये होणार पवारांच्या जातवादी राजकारणाची अखेर

बीडमध्ये होणार पवारांच्या जातवादी राजकारणाची अखेर

शरद पवारांच्या या जातीयवादी प्रचाराची दखल धनंजय मुंडे यांनी घेतलेली आहे

Google News Follow

Related

बीडमध्ये जातीय ध्रुवीकरण करून लोकसभेची निवडणूक जिंकण्याचा जोरदार प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने २००९ मध्ये केला होता. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष यंदा त्याचीच पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात आहे. पवारांचे पिल्लू मनोज जरांगे पाटील यासाठी आटापिटा करताना दिसते आहे. जरांगे मराठ्यांसोबत मुस्लिमांची मोट बांधण्याची भाषा करतायत. परंतु एकंदर मतदारांचा कल पाहता पवारांचे हे जातवादी राजकारण आज मतदानाच्या चौथ्या टप्प्यात बीडमध्ये गाडले जाणार अशी शक्यता दिसते आहे.

बीडमध्ये २००९ च्या लोकसभा निवडणूक भाजपाचे गोपीनाथ मुंडे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस अशी झाली होती. त्या निवडणुकीत वाजवा तुतारी हटवा वंजारी… ही घोषणा गाजली होती. मराठा विरुद्ध वंजारी असे वातावरण निर्माण करण्याचा प्रय़त्न केला गेला. परंतु हे जातवादी राजकारण बीडमधील मराठ्यांनी तेव्हा उधळून लावले. मुंडे यांचा या निवडणुकीत विजय झाला. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लढलेले मराठा समाजाचे नेते सुरेश धस आज पंकजा मुंडे यांच्यासाठी प्रचार करतायत.

मराठ्यांना महायुती सरकारने आरक्षण दिल्यानंतर सतत आपले अस्तित्व दाखवण्याच्या धडपडीत असलेल्या जरांगे पाटलांना उमेदवार पाडा आणि ताकद दाखवा असा मंत्र दिला आहे. जो फार कोणी मनावर घेताना दिसत नाही. सहा लाख मराठे आणि तीन लाख मुस्लीम एकत्र आले तर खाली राहते काय? असा सवाल जरांगे विचारतायत.

मुस्लीम आणि मराठे एकत्र आणण्याचा मूळ राजकीय विचार कोणी पेरला, औरंगजेब आणि अफजल खानाचा पुळका कोणाला आहे, हे महाराष्ट्र जाणून आहे. हा ब्रिगेडी विचार महाराष्ट्रात रुजावा यासाठी धडपड करणारा एक नेता महाराष्ट्रात आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीमध्ये हा विचार रुजणे शक्यच नव्हते.

हे ही वाचा:

मुंबईत अवकाळी पावसाची धडक; मेट्रो सेवा ठप्प, विमान सेवा दुसरीकडे वळवल्या

मतदारांची ओळख पटवण्यासाठी बुरखा काढायला लावला!

“पाकिस्तानला बांगड्या घालायला लावतो”

अण्णा हजारे आपले शिष्य केजरीवालांवर भडकले!

बीडमध्ये मराठा समाजाचे सुमारे सात लाख, वंजारी समाजाचे साडे चार लाख, अडीच-तीन लाख मुस्लीम आणि तीन साडे तीन लाख ओबीसी आहेत. ब्राह्मण समाजाचे मतदान किती याची कधी फार चर्चा होत नाही. बीडमध्ये ब्राह्मण समाज मोठ्या संख्येने आहे. इथे साधारण दीड लाख ब्राह्मण मतदार आहेत. त्यांची मत एकगठ्ठा पंकजा मुंडे यांना पडतील.

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा या मतदार संघात वाजवा तुतारी हटवा वंजारीच्या घोषणा फिरवतो आहे. मराठा आणि मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचा प्रय़त्न केला जातो आहे. जरांगे उघडपणे पाडा आणि ताकद दाखवा असे आवाहन करतायत. तो कोणाला पाडा असे उघड सांगत असले तरी त्यांचा रोख कोणाकडे आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पंकजा यांच्या विरुद्ध निवडणूक लढणारे बजरंग सोनावणे हे मराठा समाजाचे आहेत. त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेतले आहे.

शरद पवारांच्या या जातीयवादी प्रचाराची दखल कधी काळी त्यांचे चेले असलेल्या धनंजय मुंडे यांनीही घेतली आहे. कालपरवा बीडमध्ये झालेल्या सभेत आमच्याबद्दल इतका द्वेष का असा सरळ सवाल त्यांनी पवारांना केला. एका मुलाखतीत धनंजय मुंडे यांचा उल्लेख पवारांनी छोट्या समाजाचा तरुण असा केल्यापासून मुंडे त्यांच्यावर प्रचंड उखडले आहेत.

भाजपा नेते गोपीनाथ मुंडे आणि साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. उदयनराजे यांनी आपली मैत्री जपत पंकजा यांच्यासाठी इथे प्रचार सभा घेतली. मराठा समाजाने उदयनराजे यांचे जोरदार स्वागत केले आहे. उदयनराजे यांनी पंकजा यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असे आवाहन केले.

आपला पक्ष माती खाणार याची शरद पवारांना जेव्हा जेव्हा जाणीव होते तेव्हा ते जातीची नख बाहेर काढतात. पंकजा मुंडे यांनी सुरुवातीपासून याबाबत सामंजस्याची भूमिका घेतली आहे. मतदार समंजस आहे, काय करायचे त्याला ठाऊक आहे, असे त्यांचे ताजे विधान आहे. बीडच्या मतदाराने आज बटण दाबून कोणाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला हे ४ जून रोजी उघड होणार आहे. इथून पंकजा विजयी ठरल्या तर बीडच्या मतदारांचा कौल जातीच्या राजकारणाच्या विरोधात होता अशी इतिहासात नोंद होईल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
155,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा