28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरक्राईमनामाहोर्डिंग्जचे ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

होर्डिंग्जचे ऑडिट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाची केली पाहणी

Google News Follow

Related

घाटकोपरच्या रमाबाईनगरमधील पेट्रोल पंपावर जाहिरातीचा महाकाय फलक कोसळण्याचा प्रकार दुर्दैवी असून मुंबईतील सर्व अशा प्रकारच्या फलकांचे ऑडीट करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. अनधिकृत फलक जिथे असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. आतापर्यंत ५७ जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींवर उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असून यामध्ये जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबियांना तातडीची म्हणून ५ लाख रुपयांची मदत करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.

हे ही वाचा:

पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्या काँग्रेससोबत जाणाऱ्यांना लाज वाटायला हवी!

‘घाटकोपर दुर्घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश’

एस जयशंकर यांचा व्हिडीओ चक्क चीनच्या राजदूतांनी केला शेअर

मतदारांची ओळख पटवण्यासाठी बुरखा काढायला लावला!

घटना घडल्याचे समजताच पालिका आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापनाला बचाव कार्यांचा सूचना दिल्या होत्या. या घटनेला जबाबदार असणाऱ्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सध्या या फलकाखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित कसे बाहेर काढता येईल, याला प्राधान्य देऊन बचाव कार्य सुरु आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही शिंदे म्हणाले.

मुंबईमध्ये असणाऱ्या अशा प्रकारच्या फलकांची चौकशी करून धोकादायक आणि अनधिकृत फलक काढण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

 

पालिकेने रेल्वे पोलिसांना धरले जबाबदार

ज्या जागेवर होर्डिंग लावण्यात आले ती जागा लोहमार्ग पोलीस वेल्फेअरची जागा आहे, लोहमार्ग पोलिसांनी हे होर्डिंग लावण्यासाठी जाहिरात कंपनीला एनओसी (परवानगी) दिली होती असे महानगर पालिकेने म्हटले आहे.

लोहमार्ग पोलीस आणि जाहिरात एजन्सीने या बेकायदेशीर होर्डिंग संदर्भात मुंबई महानगर पालिकेची परवानगी अथवा एनओसी घेतलेली नव्हती. मनपा कडून जाहिरात होर्डिंगसाठी जास्तीस जास्त ४०×४०फुटाची परवानगी देते मात्र जे होर्डिंग पडले आहे त्या होर्डिंग ची साईज १२०×१२० फूट असून ते बेकायदेशीर असल्याचे महानगर पालिकेने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा