27 C
Mumbai
Monday, September 28, 2026
घरविशेषमहानदीतल्या खोल विहीरीत सापडला नैसर्गिक वायू

महानदीतल्या खोल विहीरीत सापडला नैसर्गिक वायू

ओएनजीसीची मोठी कामगिरी

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

देशांतर्गत हायड्रोकार्बन उत्पादन वाढवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. ओडिशाच्या किनाऱ्यापासून सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर महानदीच्या खोऱ्यात खोल पाण्यातील विहिरीत नैसर्गिक वायूच्या साठ्याचा शोध लागला आहे. सरकारी तेल आणि नैसर्गिक वायू कंपनी ओएनजीसीला हे यश मिळाले आहे. १८ सप्टेंबर रोजी झालेल्या या शोधामुळे भारताच्या देशांतर्गत ऊर्जा संसाधनांच्या विस्ताराच्या प्रयत्नांना बळ मिळण्याची शक्यता आहे.

ही विहीर महानदी खोऱ्यातील ओएनजीसीच्या सध्याच्या डीपवॉटर मोहिमेतील पहिली विहीर आहे. MDW-28 या विहिरीत सुमारे १,४५० मीटर खोलीवर गॅस आढळला. ओएनजीसीच्या माहितीनुसार, विहिरीतून सलग तीन दिवस उत्साहवर्धक प्रवाह आणि स्थिर जलाशय दाबासह गॅस बाहेर येत होता. मात्र, कंपनीने अद्याप गॅसचा प्रवाह दर किंवा साठ्याचा अंदाज जाहीर केलेला नाही.

महानदी खोरे हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असलेले मोठे गाळाचे म्हणजेच सेडिमेंटरी बेसिन आहे. महानदीच्या त्रिभुज प्रदेशापासून बंगालच्या उपसागरापर्यंत या बेसिनचा विस्तार आहे. लाखो वर्षांच्या कालावधीत नद्यांमधून वाहून आलेले गाळ या भागात साचत गेला. या भूगर्भीय रचनांमध्ये तेल आणि नैसर्गिक वायूसारखे हायड्रोकार्बन साठण्याची शक्यता निर्माण झाली. बेसिनचा मोठा भाग समुद्रात असल्याने येथे तेल-गॅसचा शोध घेणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक आणि खर्चिक आहे.

ओएनजीसीची नवीन शोधविहीर कोणार्कपासून सुमारे २३ नॉटिकल मैल अंतरावर असून, ज्या समुद्रभागात विहीर खोदण्यात आली त्या ठिकाणी पाण्याची खोली सुमारे ७७० मीटर आहे. सध्याच्या मोहिमेत ओएनजीसीने या बेसिनमध्ये एकूण चार विहिरी खोदण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सध्याचा गॅस शोध हा या व्यापक शोधमोहिमेतील पहिला टप्पा आहे.

भारतासाठी हा शोध महत्त्वाचा का?

भारत आपल्या ऊर्जा गरजांसाठी नैसर्गिक वायूसह मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत गॅसचा व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य साठा सापडल्यास देशातील नैसर्गिक वायूचा पुरवठा वाढण्यास आणि आयातीत ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत होऊ शकते. नैसर्गिक वायूचा वापर वीज निर्मिती, खतनिर्मिती, सिटी गॅस वितरण तसेच विविध औद्योगिक प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन वाढल्यास त्याचा परिणाम केवळ ऊर्जा क्षेत्रापुरता मर्यादित राहणार नाही.

हे ही वाचा:

अमेरिकन जवानांनी बद्रीनाथ मंदिरासह जुनागढ किल्ल्याला दिली भेट

महाराष्ट्रासह चार राज्यांत विधान परिषद निवडणुकीचा बिगुल

दुष्काळी परिस्थितीच्या आढाव्यासाठी सरकारची उपसमिती

जमुईतील अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणी मुख्य आरोपीला चकमकीनंतर अटक

मात्र, गॅसचा शोध लागणे आणि व्यावसायिक उत्पादन सुरू होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ONGCला पुढील चाचण्या आणि मूल्यांकनाच्या माध्यमातून या जलाशयाचा आकार, प्रत्यक्षात किती गॅस काढता येऊ शकतो आणि त्याचे उत्खनन आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का, हे निश्चित करावे लागणार आहे. त्यामुळे सध्या या शोधाची व्यावसायिक क्षमता निश्चित झालेली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
335,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा