34 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरविशेषनवी मुंबईला मिळाले २० लाखांचे बजेट

नवी मुंबईला मिळाले २० लाखांचे बजेट

2023 च्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळवण्याचे लक्ष ठेवले आहे.

Google News Follow

Related

२०२२ च्या स्वच्छ सर्वेक्षणात नवी मुंबई महानगर पालिकेला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ते स्थान गाठल्यावर नवी मुंबई महानगरपालिकेने (एनएमएमसी) २०२३ च्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल स्थान मिळवण्याहे लक्ष ठेवले आहे. आणि त्यासाठी तीव्र प्रयत्न देखील सुरु झाले आहेत. एनएमएमसीच्या शहर अभियांत्रिकी विभागाने शहरातील आठही वॉर्डांमध्ये सुमारे २० कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये भिंतीवरील पेंटिंगचे नूतनीकरण, नवीन कचराकुंड्या टाकणे, मलनिःसारण वाहिन्यांसाठी नवीन कव्हर, पाण्याच्या कारंज्यांची देखभाल, पेव्हर ब्लॉक पुन्हा टाकणे, रस्त्याच्या लेनच्या खुणा पुन्हा रंगवणे, झेब्रा क्रॉसिंग इत्यादींचा समावेश आहे. नेरुळ, त्यानंतर वाशी आणि तुर्भेमध्ये जास्तीत जास्त सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. सुशोभीकरण व दुरुस्तीचे काम पुढील ३ महिन्यात सुरू होण्याची पेक्षित आहे. निविदा काढण्यापूर्वी विभागाने सध्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. “सुमारे पंधरवड्यापूर्वी, प्रत्येक अभियंत्यांना मागील वर्षी झालेल्या कामांची स्थिती पाहण्यास सांगितले होते. आम्हाला कोणत्या प्रकारचे दुरुस्तीचे काम आवश्यक आहे ते ओळखायचे होते तसेच शहराचे एकंदर स्वरूप वाढवणारे नवीन योजना सुचवायच्या होत्या ,” असे अभियांत्रिकी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा : भिवंडीत सराईत गुंड गणेश कोकाटेवर अज्ञात गुंडाचा गोळीबार

मुलानेच ७० वर्षीय आईची हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली, पण

हॉटेलमध्ये शिजला कापड व्यवसायिकाच्या हत्येचा कट

नाशिककरांची ८ तारीख ठरली ‘अपघाताची’

“शहराला आकर्षक बनवण्याकरिता नवीन मार्ग शोधण्यासाठी सरकारने नुकत्याच दिलेल्या सूचनांचे पालन करून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या वर्षी, आम्ही रेल्वे सारख्या इतर एजन्सीने एनएमएमसी अंतर्गत येणाऱ्या भागात अशीच कामे हाती घेतली आहे. रेल्वे स्थानके आणि सायन-पनवेल महामार्गाचे सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही प्रत्येक एजन्सीसोबत दोन-दोन बैठका घेतल्या,” महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले. दैनंदिन गोळा केलेला कचरा उचलण्यात गुंतलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना नागरी संस्थेने आकर्षक रंगीबेरंगी जॅकेट दिले आहेत. त्यावर स्वच्छ सर्वेक्षण मिशनचे संदेश छापलेले आहेत, जेणेकरून नागरिकांमध्ये कचरा गोळा करण्याबाबत जागरूकता निर्माण होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा