32 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरविशेषएनडीए कॅडेट सैन्य प्रशिक्षणावेळी जखमी; उपचारादरम्यान मृत्यू

एनडीए कॅडेट सैन्य प्रशिक्षणावेळी जखमी; उपचारादरम्यान मृत्यू

पुणे येथील खडकवासला सैन्य प्रशिक्षण केंद्रातील घटना

Google News Follow

Related

सैन्य प्रशिक्षण घेत असताना जखमी झालेल्या एनडीए कॅडेटचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा एनडीए कॅडेट मुळचा जळगावचा होता. त्यामुळे त्याच्या मृत्यूच्या बातमीनंतर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे. यश गोरख महाले असे मृत एनडीए कॅडेटचे नाव आहे.

जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील एनडीए कॅडेट यश गोरख महाले हे नुकतेच भारतीय सैन्यात भरती झाले होते. भरतीनंतर पुणे येथील खडकवासला सैन्य प्रशिक्षण केंद्रात (National Defence Academy) त्यांचे प्रशिक्षण सुरू होते. त्यावेळी बॉक्सिंग खेळत असताना त्यांना गंभीर दुखापत झाली होती. पुढे त्यांच्यावर पुण्याच्या सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

यश गोरख महाले यांच्यावर त्यांच्या मूळ गावी म्हणजेच चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी गावात त्यांच्या पर्थिवाची  अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्य संस्कारासाठी हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. सैन्यदलात भावी काळात लेफ्टनंट कर्नल पदाची स्वप्ने पाहणाऱ्या जवानाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही  दुर्दैवी घटना घडल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त आहे.

हे ही वाचा:

कंत्राटी भरती सुरू केली काँग्रेस, राष्ट्रवादी, उबाठाने, आरोप मात्र आमच्यावर!

ललित पाटील भावासोबत ड्रग्स फॅक्टरीतून मिळवत होता बक्कळ नफा

ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या वाहनचालकाला अटक

बारामतीत विमान कोसळलं, पायलट जखमी!

एनडीए कॅडेटच्या मृत्यूनंतर त्यांचे मामा डॉ. हेमंत शेवाये यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, यश याला लहानपणापासून सैन्यात दाखल होऊन देश सेवा करण्याची इच्छा होती. त्यासाठी त्याने खडतर परिश्रम घेतले होते. मात्र, प्रशिक्षण काळात त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याची खंत आहे. एवढी खडतर मेहनत घेऊन ही त्याला देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही  दुर्दैवी घटना घडल्याची खंत आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने या घटनेची सखोल चौकशी करावी आणि उपाययोजना कराव्यात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
111,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा