26 C
Mumbai
Saturday, December 6, 2025
घरविशेषनीरज चोप्राने मोडला स्वतःचाच विक्रम!

नीरज चोप्राने मोडला स्वतःचाच विक्रम!

Google News Follow

Related

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करून नीरज चोप्रा याने इतिहास रचला होता. त्यानंतर ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने पुन्हा एकदा धमाकेदार कामगिरी करत आपलाच विक्रम मोडीत काढत इतिहास रचला आहे. नीरजने फिनलँडमध्ये झालेल्या नुरमी गेम्समध्ये हा विक्रम केला आहे. मात्र, नीरजला या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

ऑलिम्पिकनंतर जवळपास दहा महिन्यानंतर नीरज चोप्रा फिनलँडमध्ये झालेल्या नुरमी गेम्समध्ये सहभागी झाला होता. आपल्या पहिल्या प्रयत्नात त्याने ८६.९२ मीटर थ्रो केला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८९.३० मीटर थ्रो केला. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याने जोरदार प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नात ८५.८५ मीटर इतकाच थ्रो फेकता आला.

फिनलँडमधील स्पर्धेत २५ वर्षीय ऑलिव्हर हेलँडर या फिनलँडच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले. त्याने ८९.८३ मीटर भाला फेक करत सुवर्णपदकावर नाव कोरले. नीरज चोप्रा हा फिनलँडमधील या स्पर्धेत सहभागी झाला होता. जागतिक पातळीवर डायमंड लीगनंतरची ही प्रतिष्ठेची स्पर्धा समजली जाते.

हे ही वाचा:

मराठवाड्यातील पाणीप्रश्नांकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष

अनिल परब ईडी चौकशीसाठी गैरहजर

१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी

आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये

नीरज चोप्राचा यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम ८८.०७ मीटर होता. हा विक्रम त्याने मागील वर्षी मार्चमध्ये पटियाला येथे नोंदवला होता. त्यानंतर त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि राष्ट्रकुल स्पर्धेत त्याच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा