28 C
Mumbai
Saturday, June 25, 2022
घरक्राईमनामाअनिल परब ईडी चौकशीसाठी गैरहजर

अनिल परब ईडी चौकशीसाठी गैरहजर

Related

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने समन्स बजावला होता. त्यानुसार अनिल परब यांना ईडीने आज चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अनिल परब हे आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अनिल परबांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.

अनिल परब यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, अनिल परब हे शिर्डी दौऱ्यावर असल्यामुळे ते आज गैरहजर राहणार आहेत. अनिल परब यांचे वकील आज ईडी कार्यालयात जावून चौकशीसाठी वेळ मागून घेणार आहेत. अनिल परब यांना ईडीचे समन्स मिळताच किरीट सोमय्या यांनी ट्विट करत म्हटले की, “हिशेब तर द्यावा लागणार”

हे ही वाचा:

१८ तास चौकशीनंतर राहुल गांधींची आज पुन्हा चौकशी

आयपीएल मीडिया राईट्सच्या लिलावातून बीसीसीआयने कमावले इतके रुपये

संत तुकाराम शिळामंदिर हे भक्ती आणि ज्ञानाचा आधार

वट पौर्णिमेसंबंधित वक्तव्यानंतर रुपाली चाकणकरांवर होतेय टीका

अनिल परब यांनी दापोलीत अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केला आहे. या रिसॉर्ट प्रकरणात काही दिवसांपूर्वी अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीकडून धाडसत्र हाती घेण्यात आलं होतं. त्यांच्याशी संबंधित सात संस्थांवर ईडीने काही दिवसांपूर्वी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर ईडीकडून अनिल परब यांना अटक होणार का अशा जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. २६ जून २०१९ ला अनिल परब यांनी साई रिसॉर्ट कर भरल्याची मूळप्रत ईडीच्या हाती लागली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,939चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा