30.6 C
Mumbai
Saturday, June 20, 2026
घरविशेषनीट परीक्षेसाठी नागपूरच्या विद्यार्थ्याला २,४०० किलोमीटर दूर अबूधाबीमधील परीक्षा केंद्र

नीट परीक्षेसाठी नागपूरच्या विद्यार्थ्याला २,४०० किलोमीटर दूर अबूधाबीमधील परीक्षा केंद्र

एनटीएकडून तातडीने दुरुस्ती

Google News Follow

Related

नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागपूरमधील एका विद्यार्थ्याला चुकून तब्बल २,४०० किलोमीटर दूर असलेल्या अबूधाबी (यूएई) येथील परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. मात्र, विद्यार्थ्याची तक्रार समोर आल्यानंतर एनटीएने तातडीने हस्तक्षेप करून परीक्षा केंद्रातील त्रुटी दुरुस्त केल्याचे सांगितले आहे.

माहितीनुसार, नागपूरच्या या विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रासाठी दिलेल्या पसंतीक्रमात अबूधाबीचा समावेश केलेला नव्हता. तरीही त्याच्या प्रवेशपत्रावर अबूधाबी येथील केंद्र नमूद करण्यात आले. पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार असताना ही चूक उघड झाल्याने विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. परदेशात जाण्याची व्यवस्था इतक्या कमी वेळात करणे अशक्य असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

या प्रकरणाची माहिती मिळताच एनटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला. संस्थेचे महासंचालकांनी (डीजी) विद्यार्थ्याच्या प्रकरणाची तातडीने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विद्यार्थ्याला योग्य परीक्षा केंद्राचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, पुनर्परीक्षेच्या तयारीसाठी एनटीएने देशभरात व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रे डाउनलोड केली असून, परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी केंद्र सरकार आणि एनटीएकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याआधीही काही उमेदवारांना परीक्षा केंद्रांमध्ये बदल झाल्यामुळे नवीन प्रवेशपत्रे जारी करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत, असे आवाहन एनटीएकडून करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

नशेत धिंगाणा घालणाऱ्या तरुणीचा पोलिसांवर हल्ला; केस ओढत, नखांनी ओरबाडले

कांदिवलीत बँकेत चोरीचा प्रयत्न, सराईत गुन्हेगार जेरबंद

कोलकाता विमानतळावर तृणमूल-भाजपचे कार्यकर्ते भिडले

१० लाख रुपयांना बाळांची विक्री; १३ जण अटकेत

नीट-यूजी २०२६ पुनर्परीक्षा ही प्रश्नपत्रिका गळतीच्या आरोपांनंतर आयोजित करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाची परीक्षा कोणत्याही वादाविना आणि पूर्णपणे सुरक्षित वातावरणात पार पडावी यासाठी एनटीएवर मोठी जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत नागपूरच्या विद्यार्थ्याच्या परीक्षा केंद्र वाटपातील ही चूक समोर आल्याने परीक्षा व्यवस्थापनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, एनटीएने त्वरित कारवाई करून विद्यार्थ्याची अडचण दूर केल्याने त्याला दिलासा मिळाला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा