32 C
Mumbai
Monday, May 20, 2024
घरविशेषपारल्यात नवे कोरोना केंद्र

पारल्यात नवे कोरोना केंद्र

Google News Follow

Related

राज्यात सध्या कोरोनाचा कहर चालू आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा, बेड्स इत्यादींची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विले पारले येथील नगरसेवक अभिजित सामंत यांनी आपल्या प्रभागात ३० बेड्सचे कोविड सेंटर चालू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपा के पूर्व प्रभाग व रवींद्र जोशी मेडिकल फौंडेशन च्या संयुक्त विद्यमाने व केशव सृष्टी च्या सहकार्याने वॉर्ड क्र. ८४ मधील नित्यानंद मनपा स्कुल सहार रोड , कोलडोंगरी, अंधेरी पूर्व येथे ३० बेड्स करोना केअर सेन्टरचे स्थापन केले गेले आहे. या केंद्राचे उद्घाटन माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस – विरोधी पक्षनेते विधानसभा महाराष्ट्र राज्य  ह्यांच्या शुभहस्ते होणार आहे. त्याबरोबरच या कार्यक्रमासाठी माननीय श्री प्रविणजी दरेकर  विरोधी पक्ष नेता विधानपरिषद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत राहणार आहेत.

हे ही वाचा:

युएईमध्ये झळकला तिरंगा

पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात

पंडित राजन मिश्र यांचे निधन

अमेरिका पाठवणार कोविड लसीचा कच्चा माल

या सेन्टरमध्ये रुग्णांची उत्तम व्यवस्था देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने वातानुकूलित व्यवस्था, उपचार, चहा- नाष्टा- जेवण मिळणार आहे. येथे जेवण जुहू येथील इस्कॉनमध्ये तयार केलेलं जेवण मिळणार आहे. या केंद्रात मनोवैज्ञानिक तज्ञ द्वारा समुपदेशन, टीव्ही, वायफाय, मनोरंजन केंद्र, त्याशिवाय काही बेड्स ऑक्सिजन पूरक सोयी म्हणजेच oxygen concentrator, cylinder यांनी युक्त असणार आहेत. त्याबरोबरच समर्पित रुग्णवाहिका सेवा ह्या सुविधा विनामूल्य उपलब्ध असतील.

या केंद्रात मनपा वॉर रूम मार्फत ऍडमिशन दिली जाईल. ह्या केंद्राचा विलेपार्ले व अंधेरी पूर्व येथील करोना रुग्णांना उपयोग होईल. ह्या केंद्रात ६० वर्षा खालील व्यक्ती, ज्यांना अस्थमा, हृदयविकार इत्यादी आजार नाहीत तसेच ज्यांची लक्षण सौम्य असतील अशांना दाखल करून घेण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा