20 C
Mumbai
Monday, January 24, 2022
घरविशेषहेल्मेट घाला, वाहन हळू चालवा नाहीतर...

हेल्मेट घाला, वाहन हळू चालवा नाहीतर…

Related

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर जरब बसविण्यासाठी भरमसाठ दंडाची तरतुद असलेल्या नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रातही करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आता राज्यभरातील विविध वाहतूक गुन्ह्यांसाठी दंडात वाढ करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून हे नवे नियम लागू झाले आहेत.

दंडाच्या वाढीमुळे लोक रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करतील आणि ते सुरक्षितपणे वाहन चालवतील. यामुळे सुरक्षित वाहतुकीला मदत होईल आणि रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल, असे एका वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचा:

राहुल गांधींची शिवाजी पार्कवरची सभा रद्द

हवामान बदलाच्या ‘सुरक्षाकरणाला’ भारताचा विरोध

श्रीलंकेत संसद बरखास्त, संसदीय लोकशाही धोक्यात?

इंडोनेशियात भूकंपामुळे सुनामीची भिती

काय आहे नवी दंडाची रक्कम

  • दुचाकीवर हेल्मेटशिवाय प्रवास केल्यास पूर्वी ५००  रुपये इतका दंड होता. मात्र आता नव्या नियमांनुसार पहिल्या वेळी उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड असेल, तर त्यानंतर उल्लंघन केल्यास हा दंड १ हजार ५०० रुपये इतका असेल.
  • पूर्वी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बेपर्वा वाहन चालवल्यास १ हजार रुपये इतका दंड होता. पण नव्या नियमांनुसार आता दुचाकीसाठी १ हजार आणि इतर वाहनांसाठी २ हजार दंड आकारला जाईल.
  • दुचाकीवरील ट्रिपल सीटसाठीचा दंड हा २०० रुपयांवरून थेट १ हजार करण्यात आला आहे.
  • वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलताना वाहन चालवल्यास दंड २०० रुपये वरून ५०० रुपये करण्यात आला आहे.
  • हॉर्न प्रतिबंध क्षेत्रात हॉर्न वाजवल्यास दंड ५०० रुपयांवरून १ हजार रुपये करण्यात आला आहे.
  • फॅन्सी नंबर प्लेटसाठी पूर्वी १ हजार दंड होता. मात्र आता नव्या नियमावलीनुसार पहिल्यांदा उल्लंघन केल्यास ५०० रुपये दंड असेल तर त्यानंतरच्या उल्लंघनासाठी १ हजार ५०० इतका दंड असेल.
  • हायस्पीड ड्रायव्हिंगसाठी नव्या नियमावलीनुसार ५ हजार रुपये आणि परमिटशिवाय गाडी चालवल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाईल.
  • नो- पार्किंगमध्ये वाहन उभे केल्यास ५०० रुपये दंड आकाराला जाईल.

केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांच्या उल्लंघनासाठी दंड वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, महाराष्ट्र सरकारने तेव्हा सुधारित दंड स्वीकारला नव्हता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,588अनुयायीअनुकरण करा
5,780सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा