27 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरविशेषनिशिकांत दुबे मुंबईत येऊन भेटणार राज-उद्धव यांना

निशिकांत दुबे मुंबईत येऊन भेटणार राज-उद्धव यांना

एक्सवर पोस्ट करत दिले आव्हान

Google News Follow

Related

हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलेले असताना बिहारचे खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. त्यावेळी निशिकांत दुबे यांना राज ठाकरे यांनी दुबे दुबे कर मारेंगे असे उत्तरही दिले होते. आता महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचले आहे.

मुंबई महानगरपालिकांचे निकाल या महानगरपालिका निकालांमध्ये महत्त्वाचे मानले जातात. त्यात भाजपा शिवसेना युतीने बहुमत गाठले आहे. स्वाभाविकच ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मराठीच्या मुद्द्याचे काय, असा सवाल उपस्थित झाला. ठाकरे ब्रँडचे मग काय असा प्रश्न उपस्थित झाला. पण आता दुबे यांनी या निकालांमुळे ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट लिहित म्हटले आहे की, मी मुंबईला येऊन राज आणि उद्धव ठाकरेंना भेटणार आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशमध्ये हिंदू शिक्षकाचे घर जाळले

महानगरपालिकांत धुरंधर भाजपाची कमाई १२३० जागांची

पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का

टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला दिलासा, शाहीन आफ्रिदी नेट्समध्ये परतला

दुबे यांनी असेही ट्विट केले होते की, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या एकतेचा विजय झाला आहे. उद्धव ठाकरे  आणि राज ठाकरे यांच्या अस्वस्थ होण्याचे दिवस आले आहेत. मुंबईला मजबूत बनवण्यात मालक आणि मजूर सर्वांचेच योगदान आहे. विकासयुक्त, विचारयुक्त आणि भयमुक्त महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचे अभिनंदन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी  यांचे अभिनंदन. गृहमंत्री अमित शाह हे तर रणनीतीचे माहिर आहेतच.

https://x.com/nishikant_dubey/status/2012064442243039306?s=20

मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकारण तापलेले असताना मनसेकडून परप्रांतीयांना मराठी बोलण्याचे आवाहन केले होते. शिवाय, मराठी अमराठी वाद निर्माण झाला होता. त्यात अमराठी लोकांना मारहाण केल्याची प्रकरणेही समोर आली.  यावर प्रत्युत्तर देताना दुबे म्हणाले होते की, राज ठाकरेंनी बिहारमध्ये येऊन दाखवावे, त्यांना तिथे धडा शिकवू. या विधानामुळे महाराष्ट्र आणि बिहारमधील राजकीय संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असून, सोशल मीडियावरही संतापाची लाट उसळली होती.

दुबे यांनी केवळ वैयक्तिक टीका करून न थांबता महाराष्ट्राच्या आर्थिक ताकदीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. “महाराष्ट्र राज्याचा कारभार बिहारसारख्या राज्यांतून येणाऱ्या निधीवर चालतो,” असे विधान करून त्यांनी मराठी अस्मितेच्या जखमेवर मीठ चोळले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का लावणाऱ्या या विधानाचे पडसाद गल्लीपासून दिल्लीपर्यंत उमटले.

या विधानाचे गंभीर पडसाद संसदेतही पाहायला मिळाले. दुबे यांच्या विधानामुळे लोकसभेचे कामकाज स्थगित करावे लागले. संसदेच्या आवारात काँग्रेसच्या मराठी महिला खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक पवित्रा घेत दुबेंना अक्षरशः घेराव घातला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा