31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरविशेष...म्हणून नितीन देसाई खचून गेले!

…म्हणून नितीन देसाई खचून गेले!

कर्जाच्या रकमेचा एकरकमी परतावा देण्यास देसाई तयार होते पण...

Google News Follow

Related

नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल केलेल्या आरोपींचे नावे आता समोर आली आहेत.एडलवाईज कंपनीचे चेअरमन रसेश शहा यांच्यासहित इतर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात एडलवाईज कंपनीचे स्मित शहा, केऊर मेहता, आर के बन्सल आणि कोर्टाने दोन्ही पार्टी मध्ये चर्चा करून कर्जाचा विषय सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या जितेंद्र कोठारी यांचाही समावेश आहे.

 

 

रायगड पोलीस लवकरच सर्वांना समन्स देऊन चौकशीला बोलावणार असल्याचे कळते. नितीन देसाई कर्जाच्या रकमेचा एकरकमी परतावा(वन टाईम सेटलमेंट) करण्यास तयार होते. पण एडलवाईज कंपनीबरोबर त्यांच्या भेटी होऊनही होकार किंवा नकार सुद्धा कळवळा जात नव्हता. अशाच भेटींमध्ये वेळ घालवून एडलवाईज कंपनीने कर्जाच्या रकमेवर व्याज वाढण्याची वाट पाहिली आणि NCLT कोर्टात गेली असा कुटुंबीयांचा आरोप. 

हे ही वाचा:

दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांचा सभात्याग

मणिपूरवर राज्यसभेत ११ ऑगस्टला चर्चा होण्याची शक्यता

हरयाणातील हिंसाचारानंतर नूँहमध्ये बुलडोझर चालला

इंदापूरात विहिरीमध्ये पडलेल्या चार मजुरांचे मृतदेह सापडले

 

NCLT कोर्टाचा आदेश देसाईंच्या विरोधात आल्याने नितीन देसाई खचले. कंपनीने वारंवार बोलण्याचे नाटक करून कोणताच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नाही अशा प्रकारे त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गुन्ह्यात नाव असलेले जितेंद्र कोठारी यांना insolvency प्रोफेशनल म्हणून NCLT कोर्टाने नियुक्त केले होते.

 

 

पण कोठारी यांनी इतर आरोपींशी हातमिळवणी करून हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत आहे. देसाई कुटुंबियांच्या आरोपांनुसार एडलवाईज कंपनी एन डी स्टुडिओवर कब्जा करण्याच्या इराद्यात होती असा आरोप.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा