27.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेष१४९ जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोना रुग्ण नाही

१४९ जिल्ह्यांमध्ये एकही नवीन कोरोना रुग्ण नाही

Google News Follow

Related

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्र्यांसह चोविसावी बैठक केली. यामध्ये केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनी कुमार चौबेही उपस्थित होते. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली. ज्यामध्ये त्यांनी कोरोना रुग्णांची आकडेवारीही सादर केली.

देशात आतापर्यंत १ करोड़ १९ लाख १३ हजार २९२ नागरिकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्क्यांवर पोहोचलेलं आहे. १४९ जिल्ह्यांमध्ये मागील सात दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही. तर, आठ जिल्ह्यांमध्ये मागील चौदा दिवसांपासून एकाही रुग्णाची नोंद नाही. असे तीन आणखी जिल्हेही आहेत तिथे २१ दिवसांपासून एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती हर्षवर्धन यांनी दिली.

देशात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा याबातही त्यांनी आकडेवारीही सादर केली. सध्याच्या घडीला देशात ०.४६ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, २.३१ टक्के रुग्ण आयसीउयमध्ये आहेत. तर, ४.५१ रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.

हे ही वाचा:

एमपीएसी परीक्षा पुढे ढकला, राज ठाकरेंची मागणी

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरवात

मुंबई पोलिसांनी उघडकीस आणला रेमडेसिविरचा काळाबाजार

अमेरिका- युरोपने कोविशिल्डचा कच्चा माल रोखला

देशातील कोरोना परिस्थिती नेमकी कोणत्या वळणावर आहे, याबाबत सांगताना ते म्हणाले, “देशातील कोरोना मृत्यूदर हा सातत्यानं कमी होत आहे. त्यातच आरोग्य विभागात काम करणाऱ्या जवळपास ८९ लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, ५४ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा