33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरविशेषमुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील ३८ इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना!

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील ३८ इमारती भोगवटा प्रमाणपत्राविना!

Google News Follow

Related

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील ६३ पैकी ३८ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्रच (ओसी) नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई विद्यापीठाने दिली आहे. या इमारती वर्ष १९७५ पासून वर्ष २०१७ दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील इमारतीस दिलेल्या ओसीची माहिती मागितली होती. मुंबई विद्यापीठाच्या पायाभूत नियोजन,कार्यान्वयन आणि परिरक्षण खात्याने अनिल गलगली यांस कळविले की, एकूण ६३ इमारतीपैकी फक्त २५ इमारतींना भोगवडा प्रमाणपत्र मिळाले असून ३८ इमारतींना ओसी अद्यापपर्यंत मिळाली नाही. एका इमारतीस पार्ट ओसी आहे. ज्यास ओसी देण्यात आलेली आहे त्यात रानडे भवन, टिळक भवन, वर्क शॉप, WRIC गेस्ट हाऊस, एसपी लेडीज हॉस्टेल,न्यू क्लास क्वार्ट्स, महात्मा फुले भवन, ज्ञानेश्वर भवन, यूरसिसन अभ्यास स्टाफ क्वार्ट्स ए, बी, सी, डी, ई, एफ, सीडी देशमुख भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रेस गोडाऊन, अबुल कलाम बिल्डिंग, फिरोजशहा मेहता भवन, अण्णा भाऊ साठे भवन, पक्षी भवन, ग्लास भवन, कुलगुरु बंगला या इमारतीचा समावेश आहे. कल्चरल सेंटरला पार्टली ओसी आहे.

ज्यास इमारतीस अद्यापही ओसी नाही, त्यात ICSSR हॉस्टेल, रीडरर्स क्वार्ट्स 12 A, 12B, 12 C, विद्यार्थी कॅन्टीन, ओल्ड लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, जेएन लायब्ररी, जेपी नाईक भवन, WRIC प्रशासकीय इमारत, आरोग्य केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील बॉयज हॉस्टेल, एमडीके लेडीज हॉस्टेल, गरवारे इन्स्टिट्यूट ओल्ड, न्यू गरवारे इन्स्टिट्यूट, वर्क शॉप गरवारे, स्टाफ क्वार्ट्स G, पंडिता रमाबाई लेडीज हॉस्टेल, अलकेश दिनेश मोदी गॅलरी, मराठी भवन, आयडॉल इमारत, झंडू इन्स्टिट्यूट, अनेक्स बिल्डिंग, लाईफ सायन्स बिल्डिंग, एक्साम कॅन्टीन, शिक्षक भवन, पोस्ट ऑफिस, सर्व्हट क्वार्ट्स, न्यू लेक्चर कॉम्प्लेक्स, संस्कृत भवन, भाषा भवन, राजीव गांधी सेंटर, आयटी पार्क, शंकरराव चव्हाण टीचर्स टेर्निंग अकादमी,  UMDAE हॉस्टेल,, UMDAE फॉकलिटी बिल्डिंग , नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्निकल सेंटर या इमारतीचा समावेश आहे.

हे ही वाचा:

सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा

ठाकरे सरकारला दणका; देशमुख प्रकरणात सीबीआय करणार चौकशी

राज्यातील निवडणूका पुढे ढकलणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव

दिवसाला बँक फसवणुकीच्या २२९ घटना

 

अनिल गलगली यांच्या मते कालीना परिसरातील ज्या इमारतीस ओसी नाही, त्यात मुंबई विद्यापीठ आणि वास्तुविशारद यांची चूक असून या बाबीची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री उदय सामंत यांस पाठविलेल्या पत्रात केली आहे. ओसी नसलेल्या इमारतीत हजारों विद्यार्थी आणि विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची ये-जा असून मंजूर आराखडा प्रमाणे काम झाले नसून एफएसआय उपलब्ध असल्यामुळे सुधारित आराखडा सादर करण्याची आवश्यकता आहे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे. ऑटोडीसीआर ऑनलाईन प्रणाली मार्फत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास ओसी मिळवली जाऊ शकते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा