29 C
Mumbai
Monday, November 23, 2026
घरविशेषना विसावा, ना थांबा... अमूर फाल्कनने सलग १०१ तासांत गाठला सोमालियाचा किनारा

ना विसावा, ना थांबा… अमूर फाल्कनने सलग १०१ तासांत गाठला सोमालियाचा किनारा

मणिपूरहून ५,७०० किमीची न थांबता भरारी

Google News Follow

अवघे १५० ग्रॅम वजन, आकाराने लहान आणि शरीराने नाजूक; पण उड्डाणाची ताकद मात्र थक्क करणारी! मणिपूरमधून आफ्रिकेच्या दिशेने निघालेल्या ‘अलंग’ नावाच्या अमूर फाल्कन (ससाणा) पक्ष्याने सलग १०१ तास उड्डाण करत तब्बल ५,७०० किलोमीटरचे अंतर पार केले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात या पक्ष्याने कुठेही विश्रांतीसाठी थांबा घेतला नाही. अरबी समुद्रावरून सलग उड्डाण करत अलंग सोमालियाच्या किनाऱ्यावर पोहोचली आहे. तिच्यासोबत प्रवासाला निघालेला ‘अपापांग’ हा दुसरा पक्षीही ९५ तासांत ४,१०० किलोमीटर अंतर पार करून आफ्रिकेच्या दिशेने उड्डाण करत आहे.

मणिपूरमधील तामेंगलोंग जिल्ह्यातील चिउलुआन या ठिकाणाहून या दोन्ही पक्ष्यांनी आफ्रिकेच्या दिशेने प्रवास सुरू केला. त्याआधी त्यांनी या परिसरात जवळपास २५ दिवस मुक्काम केला होता. या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात कीटक आणि वाळवी खाऊन शरीरात ऊर्जेचा साठा तयार केला. कारण पुढील प्रवासात त्यांना अरबी समुद्राचा हजारो किलोमीटरचा टप्पा कोणताही थांबा न घेता पार करायचा होता.

उपग्रहाद्वारे पक्ष्यांच्या प्रवासावर लक्ष

भारतीय वन्यजीव संस्थेच्या (WII) शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये या पक्ष्यांना हलके उपग्रह ट्रान्समीटर बसवले होते. मणिपूर अमूर फाल्कन ट्रॅकिंग प्रकल्पांतर्गत ही मोहीम राबवण्यात आली. या उपकरणांमुळे पक्ष्यांचे स्थान, प्रवासाचा मार्ग आणि उड्डाणाचा कालावधी यांची माहिती मिळते. तमिळनाडूच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांनी सोशल मीडियावर या पक्ष्यांच्या प्रवासाची माहिती आणि उपग्रहाद्वारे मिळालेली आकडेवारी शेअर केली.

हे ही वाचा:

गारठलेल्या सकाळी मुंबई धुरक्यात हरवली

गारठलेल्या सकाळी मुंबई धुरक्यात हरवली

बिसलेरीचे पाणी प्रयोगशाळेच्या तपासणीत असुरक्षित

प्रसादाच्या नावाखाली चिक्की खायला देत दांपत्याला लुटले

अमूर फाल्कन हे स्थलांतर करणारे शिकारी पक्षी असून त्यांचे प्रजनन क्षेत्र पूर्व रशिया, ईशान्य चीन आणि मंगोलियामध्ये आहे. हिवाळ्यात ते आफ्रिकेतील दक्षिण आणि पूर्व भागात स्थलांतर करतात. या प्रवासादरम्यान ईशान्य भारतातील मणिपूर आणि नागालँड ही त्यांच्यासाठी महत्त्वाची विश्रांतीस्थळे ठरतात.

शिकारी पक्ष्यांचे संरक्षक बनले स्थानिक नागरिक

अमूर फाल्कनच्या संवर्धनात मणिपूरमधील स्थानिक समुदायांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. पूर्वी या पक्ष्यांची शिकार केली जात होती. मात्र, जनजागृती आणि संवर्धनाच्या प्रयत्नांमुळे स्थानिक नागरिक आता त्यांच्या अधिवासाचे आणि मुक्कामाच्या ठिकाणांचे संरक्षण करत आहेत. उपग्रह ट्रॅकिंगमुळे या पक्ष्यांच्या स्थलांतराचे मार्ग आणि त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक माहिती मिळण्यास मदत होत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा