25 C
Mumbai
Thursday, February 22, 2024
घरविशेषमनोज जरांगेच्या भगव्या वादळाला मुंबई पोलिसांचा लगाम!

मनोज जरांगेच्या भगव्या वादळाला मुंबई पोलिसांचा लगाम!

आझाद मैदान, शिवाजी पार्कमध्ये मनाई; मुंबई पोलिसांकडून नोटीस

Google News Follow

Related

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या समर्थकांसह मुंबईत दाखल होत आहेत. मुंबईतील आझाद मैदान येथे मनोज जरांगे २६ तारखेला दाखल होऊन आमरण उपोषण करणार आहेत.तत्पूर्वी, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलिसांना नोटीस पाठवली होती. हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटील यांना
नोटीस पाठवण्यात आली आहे.आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानात आंदोलनासाठी परवानगी नाकारल्याचे नोटीसमधून सांगण्यात आले आहे.तसेच मनोज जरांगेच्या आंदोलनासाठी आझाद मैदानात स्टेज बांधण्याचं काम चालू होत.आता हे स्टेज देखील काढण्याच्या सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

मराठा समाजाच्या आरक्षणाची एक हाती बाजू मनोज जरांगे यांनी उचलून धरली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत शांत बसणार नाही असे आवाहन जरांगे यांनी केले होते.मराठा समाजाला आरक्षण देणार असे राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात आले.परंतु, मराठा समाजाला सरसकट आणि लवकर आरक्षण मिळावे अशी मागणी जरांगे यांची आहे.त्या हेतून जरांगे आपल्या सहकाऱ्यांसह मुंबई गाठायला बाहेर पडले आहेत.२६ तारखेला मुंबईत दाखल होऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत.त्याआधीच मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवून आंदोलनाच्या जागेत बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच त्यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानात बांधण्यात आलेले स्टेज देखील काढण्याच्या सूचना मुंबई पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, सकल मराठा समाज आंदोलक हे प्रचंड मोठया वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होईल आणि मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था बिघडेल. आंदोलकांची संख्या लक्षात घेता मुंबईत आंदोलकांना जागा पुरेल एवढे मोठे एकही मैदान नाही.मुंबईत अंदाजे दररोज ६० ते ६५ लाख नागरिक हे नोकरी निमित्ताने ट्रेन व इतर वाहतुकीच्या माध्यमाने प्रवास करत असतात.आझाद मैदानाचे ७,००० स्क्वेअर मीटर एवढेच क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेले असून त्याची क्षमता ५,००० ते ६,००० आंदोलकांना सामावून घेण्याएवढीच आहे. परंतु लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मैदानात उतरले तर त्यांना मैदानात उभे करण्यास पर्यायी जाग उपलब्ध होणार नाही, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जयपूरमध्ये दाखल

अभिनेत्री रेवती म्हणाली, ‘आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत, हे पहिल्यांदाच मोठ्याने बोललो’

राम मंदिर अभिषेक कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग, कॉलेजने ठोठावला दंड!

भारताकडून कॅनडामधील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न; कॅनडाचा नवा मुद्दा

मुंबई उच्चन्यायालयाकडून मराठा आंदोलनासाठी योग्य जागेची सोय करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले होते.उच्च न्यायालयाचा उल्लेख करत पोलिसांनी सांगितले की, ज्याअर्थी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी आम्हांस आंदोलनासाठी योग्य जागा आपणांस कळविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत, त्याअर्थी आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान, सेंटर पार्क जवळ, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई हेच मैदान संयुक्तिक राहील. तरी सदर ठिकाणी आंदोलन करण्याकरिता आपण संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करुन रितसर परवानगी घ्यावी.

म्हणून ज्याअर्थी मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी क्रिमिनल रिट पिटीशन क. १८८/२०२४ यामध्ये दि. २४.०१.२०२४ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामध्ये उद्धृत केलेले मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांचे अमित साहनी वि. पोलीस आयुक्त व इतर या प्रकरणातील न्याय निर्णय (विशेषतः परिच्छेद क. १७, १९ व २१ मध्ये दिलेले दिशानिर्देश), तसेच मा. सर्वोच्च न्यायालय व विविध उच्च न्यायालये यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या इतर न्याय निर्णयामध्ये आंदोलनकर्त्यासाठी दिलेले निर्देश यांचे तंतोतंत अनुपालन आपण रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणांवर करणे अनिवार्य आहे. त्याचे अनुपालन न केल्यास मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांची अवमानना होईल याची आपण नोंद घ्यावी, आझाद मैदान पोलीस ठाणे मुंबई, मुंबई पोलिसांच्या या नोटिसीद्वारे मनोज जरांगे यांना समज देण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
130,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा