26 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरविशेषमध्य प्रदेशच्या चंबळ खोऱ्यात आता डाकुंची पैदास संपली, होणार शेती !

मध्य प्रदेशच्या चंबळ खोऱ्यात आता डाकुंची पैदास संपली, होणार शेती !

शेतकऱ्यांसाठी उघडणार संधीची नवी कवाडे

Google News Follow

Related

कधी काळी डाकुंचा अड्डा म्हणून ओळखला जाणारा मध्य प्रदेशचा चंबळ परिसर आता आपली नवी ओळख घडवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या प्रदेशात शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचे उद्दिष्ट या नापीक जमिनींना संपन्न कृषी क्षेत्रात बदलणे हे आहे.

१२ मार्च (बुधवार) रोजी मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या दिशेने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सरकारने ठरवले आहे की, झाशी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत चंबळ परिसरात एक बागायती (हॉर्टिकल्चर) महाविद्यालय स्थापन केले जाईल. हे महाविद्यालय शेती क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल तसेच शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देईल.

बैठकीनंतर नगरीय प्रशासन मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी सांगितले की, चंबळच्या खोऱ्यात सिंचन व्यवस्था सुधारण्यासाठी ‘नदी-जोडो योजना’ लागू केली जात आहे. या योजनेंतर्गत पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित केले जाईल. सरकारला आशा आहे की यामुळे कृषी उत्पादनात मोठी वाढ होईल.

हे ही वाचा:

रोहितचे टार्गेट २०२७ विश्वचषक – पॉटिंग

दिल्लीमधून २० हून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक

भारत-नेपाळ सीमेवर बेकायदेशीर घुसखोरी करताना बांगलादेशी नागरिकाला अटक!

डिजिटल व्यवहारात लक्षणीय वाढ !

हॉर्टिकल्चर कॉलेजसाठी केंद्र सरकारने १००० कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. विजयवर्गीय म्हणाले, “हे महाविद्यालय चंबळ-ग्वालियर प्रदेशासाठी मैलाचा दगड ठरेल. आता पीकांमध्ये बदल करण्याची वेळ आली आहे. आपल्या कृषी उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ही संस्था शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक पद्धती शिकवेल, ज्यामुळे ते अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर शेती करू शकतील.”

विजयवर्गीय यांनी राज्याच्या आर्थिक प्रगतीवरही प्रकाश टाकत सांगितले की, २००४ मध्ये मध्य प्रदेशचे दरडोई उत्पन्न फक्त ११ हजार रुपये होते, जे आता वाढून १.५२ लाख रुपये झाले आहे. हे सरकारच्या विकासनीतींचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले. सरकारच्या या उपक्रमामुळे खोऱ्यात शेतीचा विकास होईल तसेच स्थानिक शेतकऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील. जर ही योजना यशस्वी ठरली, तर पुढील काही वर्षांत चंबळ परिसर केवळ दस्यु प्रदेश म्हणून ओळखला जाणार नाही, तर एक हरित आणि समृद्ध क्षेत्र म्हणून विकसित होईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा