29 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
घरविशेषमहाराष्ट्रात रस्ते ठरत आहेत जीवघेणे, तीन वर्षांत मृतांचा आकडा २ हजारांनी वाढला

महाराष्ट्रात रस्ते ठरत आहेत जीवघेणे, तीन वर्षांत मृतांचा आकडा २ हजारांनी वाढला

रस्ते अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

Google News Follow

Related

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे एक बस दरीत कोसळून किमान पाच अल्पवयीन मुलांसह १३ जणांचा मृत्यू झालातर २९ जण जखमी झाले. घटनेनंतर महाराष्ट्रातील रस्ते अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका आकडेवारीनुसार गेल्या वर्षी महाराष्ट्रात रस्ते अपघातात एकूण १४,८८३ जणांचा मृत्यू झाला. हा आकडा कोरोनापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये झालेल्या १२,७८८ मृत्यूंच्या तुलनेत २,०९५ जास्त मृत्यू झाले आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, तीन वर्षांपूर्वीच्या तुलनेत गेल्या वर्षी अशा घटनांमध्ये १४४ ने वाढ झाली आहे.

आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये राज्यात ३२,९२५ रस्ते अपघात झाले. तर गेल्या वर्षी सुमारे ३३,०६९ रस्ते अपघात झाले. २०१९ च्या तुलनेत गेल्या वर्षांमध्ये अपघातांच्या संख्येत ०. ४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, मृत्यू दरात १६.३८ टक्के वाढ नोंदवली गेली. मात्र, या काळात जखमींच्या संख्येत घट झाली आहे. ही संख्या २८,६२८ वरून २७,२१८ वर आली आहे. महाराष्ट्रात रस्ते अपघात आणि मृत्यूचे प्रमाण २०२० मध्ये कमी झाल्याचे दिसून आले. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुले हे प्रमाण घेतले होते मात्र, २०२१ नंतर ही संख्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण २०२२-२३ च्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ मध्ये महाराष्ट्रात ३३,०६९ रस्ते अपघात झाले. या अपघातांमध्ये १४,८८३ मृत्यू आणि २७,२१८ लोक जखमी झाले. २०२१-२२ मध्ये हीच संख्या अनुक्रमे २९,४७७ आणि २३,०७१ होती. त्यामुळे या आकड्यांवरून मृत्यू आणि दुखापतींच्या संख्येत वाढ झाली असल्याचा कल दिसून येतो.

हे ही वाचा:

देशात कोविडचे १०,०९३ नवे रूग्ण, तरीही किंचित घट

राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी

काँग्रेसला ना उद्धवजींच्या मानाची चिंता, ना मानेची

शरद पवार आता नेमकं काय करतील?

मुंबईत प्रमाण घटले
मुंबईत मात्र अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.२०२२-२३ मध्ये मुंबईत १,७७३ रस्ते अपघात झाले. या अपघातात २७२ लोकांचा मृत्यू झाला आणि १,६२० जखमी झाले. गेल्या वर्षी मुंबईत २,२१४ रस्ते अपघात झाले होते. ज्यात ३८७ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १,९४४ जण जखमी झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा