29.3 C
Mumbai
Wednesday, October 14, 2026
घरविशेषओमानी सहवैमानिकाची कबुली...विमान पाडायचे होते, मृत्यूची भीती नव्हती!

ओमानी सहवैमानिकाची कबुली…विमान पाडायचे होते, मृत्यूची भीती नव्हती!

चौकशीदरम्यान आली माहिती समोर

Google News Follow

Related

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित माछर यांच्यावर हल्ला करणाऱ्या सहवैमानिकाने विमान पाडण्याचा आपला हेतू चौकशीत स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. सौदी अरेबियातील चौकशीदरम्यान त्याने “मला विमान पाडायचे  होते आणि मला मृत्यूची भीती नव्हती,” असे सांगितल्याचा दावा चौकशीची माहिती असलेल्या सौदी अधिकाऱ्याच्या हवाल्याने ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने केला आहे.

हम्माम अल-हम्मामी हा २९ वर्षीय ओमानी नागरिक असून, हल्ल्यानंतर विमानाने सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर त्याला तेथे ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्याला संयुक्त अरब अमिरातीमध्ये परत आणण्यात आले असून, सध्या तेथील अधिकारी त्याची चौकशी करत आहेत.

संयुक्त अरब अमिरातीच्या ऍटर्नी जनरल यांनी शनिवारी सांगितले होते की, सहवैमानिकाने दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इस्रायलमधील यंत्रणा या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. हल्लेखोराचे बाहेरील कोणत्याही शक्ती किंवा संघटनेशी संबंध होते का, याचाही तपास केला जात आहे.

हम्मामीवर विमानातील आपत्कालीन ‘क्रॅश ॲक्स’च्या साहाय्याने कॅप्टन स्मित यांच्यावर वारंवार हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याने विमानाचा ताबा घेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, कॅप्टन स्मित यांनी अखेर कॉकपिटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले. त्यानंतर विमानातील प्रवासी आणि इतर कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत केली.

हे ही वाचा:

भारतीय बॉक्सिंगची वाटचाल ४४व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर!

‘विंडीजविरुद्ध मालिका जिंकणे ही टीम इंडियाची प्राथमिकता’

शेतात राबणार रोबोट्स, ड्रोन

पंजाबमध्ये मोठा दहशतवादी कट उधळला; AK-47 सह हँड ग्रेनेड जप्त

हम्मामीच्या कट्टरतावादाची चौकशी

हम्मामीचा जन्म ओमानी वडील आणि सीरियन आईच्या पोटी झाला असून, तो अनेक वर्षे दुबईमध्ये राहत होता. सीरियातील प्रदीर्घ गृहयुद्धाच्या काळात त्याने काही काळ सीरियातही वास्तव्य केले होते. तपास यंत्रणा आता सीरियात असताना त्याच्यामध्ये कट्टरतावादी विचार विकसित झाले होते का, याचा तपास करत आहेत. सीरियात त्या काळात इस्लामी बंडखोर आणि बशर अल-असद यांच्या सरकारमध्ये संघर्ष सुरू होता.

त्याच्या समाजमाध्यमांवरील हालचालींचीही तपासणी केली जात आहे. त्याचे एक्स खाते हटवण्यात आले असले, तरी इंटरनेट आर्काइव्हच्या माध्यमातून त्याच्या खात्यावरील ३ हजारांहून अधिक पोस्टचे स्क्रीनशॉट अद्याप उपलब्ध असल्याचे अहवालात म्हटले आहे. या पोस्टपैकी काही पोस्टमध्ये महिलांनी नोकरी करण्यास त्याचा विरोध असल्याचे दिसून येते. तसेच बुरखा किंवा पडदा करणाऱ्या धार्मिक महिलांबद्दल त्याने पसंती व्यक्त केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
337,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा