29.5 C
Mumbai
Saturday, November 28, 2026
घरविशेष‘ओंकार’ हत्ती पुन्हा आपल्या कुटुंबाच्या कळपात

‘ओंकार’ हत्ती पुन्हा आपल्या कुटुंबाच्या कळपात

महाराष्ट्र-गोव्यातील वन विभागाच्या प्रयत्नांना यश

Google News Follow

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून आपल्या मूळ कळपापासून दूर भटकणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीचा अखेर आपल्या कुटुंबाशी पुनर्मिलाप झाला आहे. दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील घनदाट जंगलात ओंकारची त्याच्या मूळ कळपाशी भेट झाली. या घटनेला वन विभागाचे उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा यांनी अधिकृत दुजोरा दिला आहे. वर्षभर सुरू असलेल्या ओंकारच्या भटकंतीला अखेर पूर्णविराम मिळाल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह स्थानिक ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन्मलेला ओंकार अधूनमधून आपल्या कळपापासून वेगळा होत असे. मात्र, गेल्या वर्षभरापासून तो दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ आणि वेंगुर्ले तालुक्यांतील विविध गावांमध्ये फिरत होता. याशिवाय त्याने महाराष्ट्राची सीमा ओलांडून गोव्यातील जंगल आणि मानवी वस्त्यांजवळही संचार केला. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांच्या वन विभागांनी विशेष पथके तैनात केली होती. ओंकारच्या सुरक्षिततेसाठी वन कर्मचाऱ्यांकडून चोवीस तास देखरेख ठेवली जात होती.

हे ही वाचा:
भारताच्या परकीय चलनसाठ्याला पुन्हा मोठा धक्का

आठ कंपन्यांना आयपीओ आणण्यासाठी सेबीची मंजुरी

ऊर्जा क्षेत्रात २०० लाख कोटींच्या गुंतवणुकीची संधी

भारतीय शेअर बाजाराची सात महिन्यांत ९ लाख कोटींची कमाई

ओंकारच्या या भटकंतीने स्थानिक नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले होते. त्याला पाहण्यासाठी अनेक गावांमध्ये नागरिकांची गर्दी होत असे. तरुणाईमध्ये त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची मोठी क्रेझ निर्माण झाली होती. काही नागरिक ओंकारला गणपतीचे रूप मानत असल्याने त्याच्या पायांच्या ठशांची पूजाही केली जात होती. मात्र, त्याच्या वावरामुळे दुसरीकडे शेती, बागायती आणि वाहनांचे नुकसान होत होते. त्यामुळे काही ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. वन विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

अखेर कोलझरच्या जंगलात ओंकारची आपल्या कळपाशी भेट झाल्याने वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने ही महत्त्वाची घटना ठरली आहे. हत्ती हा कळपात राहणारा सामाजिक प्राणी असल्याने त्याला पुन्हा आपल्या समूहात स्थान मिळणे महत्त्वाचे मानले जाते. आता ओंकार नैसर्गिक अधिवासात स्थिरावेल, अशी आशा वन विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, तो पुन्हा कळपापासून वेगळा होऊन भटकंती करणार का, याकडे वन विभागासह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा