28.1 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरविशेषऑपरेशन सिंदूर: वायव्य भारतातील विमानतळे काही काळासाठी बंद

ऑपरेशन सिंदूर: वायव्य भारतातील विमानतळे काही काळासाठी बंद

एअर इंडियाकडूनही अनेक उड्डाणे रद्द

Google News Follow

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेण्यास सुरुवात केली असून ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) दहशतवादी तळांवर जोरदार हल्ला चढवला आहे. सेनादल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे ७ मे रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास पाकिस्तानच्या दहशतवाद पोसणाऱ्या नऊ ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर आता भारतात अलर्ट असून खबरदारी म्हणून भारतातील काही विमानतळे बंद करण्यात आली आहेत.

भारतीय सेनेने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर वायव्य भारतातील काही भागातील विमानतळे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले होते. यात जणांचा मृत्यू झाला होता.

धर्मशाळा (DHM), लेह (IXL), जम्मू (IXJ), श्रीनगर (SXR) आणि अमृतसर (ATQ) यासारख्या प्रमुख विमानतळांवर उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, या विमानतळांवरून येणाऱ्या सर्व निर्गमन, आगमन आणि कनेक्टिंग फ्लाइट्सवर परिणाम होऊ शकतो. प्रवाशांना त्यांच्या विमान कंपन्यांकडून त्यांच्या विमानांची स्थिती तपासण्याचा आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने आज दुपारी १२ वाजेपर्यंत जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या नऊ शहरांना जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द करण्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांकडून पुढील अपडेट मिळेपर्यंत ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अमृतसरला जाणारी दोन आंतरराष्ट्रीय विमानेही दिल्लीकडे वळवण्यात आली आहेत. तसेच आज श्रीनगर विमानतळ बंद असल्याने कोणतीही नागरी उड्डाणे होणार नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूरचा परिणाम आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही होत असून पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे कतार एअरवेजने पाकिस्तानला जाणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत. एअरलाइनने सांगितले की ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे याचा पुनरुच्चार केला.

हे ही वाचा:

भारताचे ऑपरेशन सिंदूर सुरू, पाकव्याप्त काश्मिरातील ९ ठिकाणी भारतीय लष्कराने केला हल्ला

भारतासाठी असलेले पाणी भारतातच राहील, भारतच ते उपयोगात आणेल!

पाकिस्तानला आठवले मिया चन्नू…

राज्यातील ‘या’ १६ शहरात होणार ‘मॉक ड्रिल’!

भारतीय लष्करासह अनेक राजकीय नेत्यांनी एक्सवर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू असे म्हणत या मोहिमेची पुष्टी केली. एकीकडे ७ मे रोजी मॉक ड्रिल देशभरात होईल, असे म्हटले जात असताना भारताने त्याआधीचं पाकिस्तानला कठोर उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तान साखरझोपेत असताना हा हल्ला केला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘भारतमाता की जय’ असे एक्सवर पोस्ट करत या हल्ल्याची पुष्टी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा