30 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरविशेषदातांवर शस्त्रक्रिया करताना युवक दगावला!

दातांवर शस्त्रक्रिया करताना युवक दगावला!

पीडित युवकाच्या कुटुंबाने केले आरोप

Google News Follow

Related

हैदराबादच्या जुबली हिल्स येथील एका क्लिनिकमध्ये २८ वर्षीय तरुणाची दातांच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची अजब घटना समोर आली आहे.लक्ष्मी नारायण विंजाम असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांनी एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिक विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी पोलिसांनी एफएमएस इंटरनॅशनल डेंटल क्लिनिकवर आयपीसीच्या कलम ३०४A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

१६ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली.मृत तरुणाच्या दातांच्या शस्त्रक्रियेदरम्यान त्याला भूल देण्यात आली.मात्र, देण्यात आलेल्या भुलीच्या औषधाचे प्रमाण जास्त असल्यामुळे तरुणाचे भान हरपले आणि त्याचा मृत्यू झाला, असा आरोप मृत तरुणाचे वडील विंजाम रामुलू यांनी केला.मिळालेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मी नारायण हा एकटाच ‘स्माइल डिझायनिंग’ शस्त्रक्रियेदरम्यान क्लिनिकमध्ये गेला होता.

हे ही वाचा:

अश्विन रामास्वामी बनले अमेरिकेत निवडणूक लढवणारे पहिले भारतीय-अमेरिकी जेन झेड

पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले नाव कायम राहणार

झारखंड: दोन शालेय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने केली ५० लाखांची फसवणूक!

गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध

त्यावेळी संध्याकाळी तरुणाचे वडील रामुलू यांनी त्याला फोन केला.मात्र, हा कॉल क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी उचलला आणि उत्तर दिले की, त्यांचा मुलगा शस्त्रक्रियेदरम्यान बेशुद्ध पडला होता.क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांनी दावा केला की, तरुणाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तक्रारदार रामुलू यांनी आपल्या तक्रारीत सांगितले की, आमचे कुकटपल्ली जवळील हैदरनगर येथे घर आहे.माझ्या मुलाने ट्रीटमेंटसाठी जेव्हा घर सोडले तेव्हा तो पूर्णपणे बरा होता. त्याला कोणत्याही आरोग्याच्या समस्या न्हवत्या.डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे सर्व घडले असा आरोप त्यांनी केला.दरम्यान, पोलिसांनी डेंटल क्लिनिकवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे आम्ही क्लिनिकमधून वैद्यकीय रेकॉर्ड जप्त केले आहेत आणि सीसीटीव्ही फुटेज गोळा करत आहोत, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा