बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान हसीना शेख यांच्यावर मोठी करण्यात येत आहे. न्यायालयाने त्यांच्या मालमत्ता आणि त्यांच्या नातेवाईकांची बँक खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत. हसीना शेख यांच्याव्यतिरिक्त त्यांचा मुलगा आणि नातेवाईकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, हसीना शेख सध्या भारतात निर्वासित आहेत.
ढाका येथील न्यायालयाने हे जप्तीचे आदेश दिले आहेत. हसीना शेख यांचे धनमोंडी येथील निवासस्थान ‘सुधासदन’ आणि इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाने हसीना शेख यांच्या कुटुंबाशी जोडलेली १२४ बँक खाती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. ढाका महानगर वरिष्ठ न्यायाधीश झाकीर हुसेन गालिब यांनी हे आदेश जारी केले आहेत.
एसीसी म्हणजेच भ्रष्टाचार विरोधी आयोगाने दाखल केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने हसीना शेख आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. हसीना शेख यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय, मुलगी सायमा वाजेद पुतुल, बहिण शेख रेहाना आणि त्यांची मुलगी ट्युलिप सिद्दिकी आणि रदवान मुजीब सिद्दिकी यांच्या मालकीच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हे ही वाचा :
न्यूयॉर्कमध्ये फिलिस्तीन समर्थक आक्रमक
डलमऊ भागात होळीला रंगाऐवजी चक्क शोक पाळला जातो
३० दिवसांच्या युद्धबंदी कराराला युक्रेनची सहमती; रशिया काय निर्णय घेणार?
दरम्यान, गेल्या वर्षी आरक्षणाच्या मुद्यावरून विद्यार्थांनी निदर्शने केल्या. या निदर्शनाचे नंतर हिंसाचारात रुपांतर झाले. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेवरून अखेर हसीना शेख यांनी बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या. हसीना शेख यांच्यानंतर बांगलादेशची सत्ता मुहम्मद युनुस यांची हाती आली आहे.
हे