30 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरविशेषजेएनयूमधील 'फुकट्यां'चा बंदोबस्त होणार!

जेएनयूमधील ‘फुकट्यां’चा बंदोबस्त होणार!

अनेक विद्यार्थ्यांचे बेकायदा वास्तव्य, कुलगुरूंनी व्यक्त केली खंत

Google News Follow

Related

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितले की, जेएनयू विद्यापीठ फ्रीलोडर्समुळे त्रस्त आहे.जेएनयूमधील अनेक विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करूनही वसतिगृहात राहत आहेत, तर अनेक बेकायदेशीर पाहुणेही येथे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कुलगुरूंनी ही माहिती दिली.

व्हीसी पंडित पुढे म्हणाल्या की, कोणत्याही विद्यार्थ्याला ५ वर्षांपेक्षा जास्त काळ वसतिगृहात राहू देऊ नये अशा कठोर सूचना वसतिगृह प्रशासनाला दिल्या आहेत.पंडित यांना विचारण्यात आले की, अनेक फ्रीलोडर्स जेएनयूमध्ये करदात्यांच्या पैशावर राहत असल्याचा आरोप आहे. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, हे अगदी बरोबर आहे. विद्यापीठात फ्रीलोडर्सची संख्या वाढली आहे.

शांतीश्री पंडित यांनी स्वतः या विद्यापीठातुन शिक्षण घेतले आहे.चेन्नईच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून मास्टर्स पूर्ण केल्यानंतर पंडित यांनी १९८५ ते १९९० दरम्यान जेएनयूमधून एमफिल आणि पीएचडी केली. त्या म्हणाल्या की, मी विद्यार्थी असतानाही ही समस्या होती, पण आता ती समस्या वाढली आहे.मी जेव्हा होती तेव्हाही अनेक विद्यार्थी अभ्यासाची वेळ संपल्यानंतर तिथेच राहायचे, पण अशा विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी होती.जेएनयूमधील काही विद्यार्थ्यांना सर्व काही विनामूल्य आणि अनुदानित हवे आहे.जेएनयूचे कॅन्टीन लोकसभेच्या कॅन्टीनपेक्षा स्वस्त आहे.

आमच्या काळात शिक्षक खूप कडक असायचे.स्वतःचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या की, जेव्हा मी पीएचडी करत होती तेव्हा माझ्या संशोधनावर देखरेख ठेवणाऱ्या प्राध्यापकाने सांगितले होते की, साडेचार वर्षांत तुम्ही तुमचे संशोधन पूर्ण केले नाही, तर तुम्हाला येथून जावे लागेल. मला माहित होते की माझी फेलोशिप वाढवण्यासाठी प्राध्यापक माझ्या अर्जावर सही करणार नाहीत. तेव्हापासून गोष्टी बदलल्या आहेत. अनेक प्राध्यापक आता अशा मुदतवाढीस परवानगी देत ​​आहेत. त्यामुळे फ्रीलोडर्सची संख्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भाजपाने निकलापूर्वीच लोकसभेचे खाते उघडले! सुरतमध्ये मुकेश दलाल बिनविरोध विजयी

घराणेशाहीच्या कारखान्याला लोकांनी कुलूप लावले; राहुल, अखिलेश शोधत आहेत चाव्या!

इस्रायल लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुखांचा राजीनामा

‘मठ, मंदिरांच्या संपत्तीवर काँग्रेसची नजर’

शांतीश्री पंडित पुढे म्हणाल्या की, कॅम्पसमध्ये असे लोक आहेत, जे बेकायदेशीर पाहुणे आहेत, जे जेएनयूचे विद्यार्थी नाहीत, परंतु येथे राहत आहेत. ते एकतर यूपीएससी किंवा इतर परीक्षेची तयारी करत आहेत. अशा लोकांसाठी जेएनयू ही सर्वात स्वस्त जागा आहे. नैऋत्य दिल्लीत तुम्हाला राहण्यासाठी जागा मिळेल, जिथे हिरवळ आणि ढाबे आहेत जिथे स्वस्त जेवण मिळते.

ही अडचण दूर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे कुलगुरू यांनी सांगितले.आम्हाला खोलीच्या आत जाणे खूप कठीण आहे, परंतु आम्ही नियमांचे पालन करतो आणि एखाद्याच्या खोलीत प्रवेश करतो. आम्ही विद्यार्थ्यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवतो आणि त्यांनी पाहुणे आणल्यास किमान आम्हाला कळवावे, अशी अपेक्षा आहे.कोणत्याही विद्यार्थ्याला पाच वर्षांहून अधिक काळ राहू देऊ नये, अशा सक्त सूचनाही आम्ही वसतिगृह प्रशासनाला दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही ओळखपत्र अनिवार्य करत आहोत. आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचे ओळखपत्र नेहमी सोबत ठेवण्यास सांगत आहोत आणि विचारल्यावर ओळखपत्र दाखवण्यास सांगत आहोत. आम्ही विद्यार्थ्यांना फ्रीलोडर्सबद्दल सांगण्यास देखील सांगत आहोत, कारण अनेक विद्यार्थ्यांना असे लोक आवडत नाहीत, असे शांतीश्री पंडित यांनी सांगितले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा