28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेषऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ५०० वर्षे जुनी ब्राँझची मूर्ती भारताला परत करणार!

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी ५०० वर्षे जुनी ब्राँझची मूर्ती भारताला परत करणार!

भारत सरकारने मूर्ती परत करण्यासाठी केली होती विनंती

Google News Follow

Related

ब्रिटनच्या प्रतिष्ठित ऑक्सफर्ड विद्यापीठाने तामिळनाडूतील एका मंदिरातून चोरीला गेलेली ५०० वर्षे जुनी ब्राँझ मूर्ती भारताला परत करण्याचे मान्य केले आहे.‘११ मार्च २०२४ रोजी, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या परिषदेने अश्मोलियन संग्रहालयातून संत तिरुमनकाई अल्वर यांचे १६व्या शतकातील ब्राँझ शिल्प परत करण्याच्या भारतीय उच्चायुक्तांच्या दाव्याचे समर्थन केले. हा निर्णय आता धर्मादाय आयोगाकडे मंजुरीसाठी सादर केला जाईल,’ असे विद्यापीठाच्या अश्मोलियन संग्रहालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

संत तिरुमनकाई अल्वर यांची ६० सेमीची उंची मूर्ती ऑक्सफर्ड विद्यापीठातील अश्मोलियन म्युझियमने १९६७मध्ये डॉ. जे. आर. बेलमोंट (१८८६-१९८१) नावाच्या एका संग्राहकाच्या संग्रहातून सोथेबीच्या लिलावगृहातून विकत घेतली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका स्वतंत्र संशोधकाने हा प्राचीन पुतळा चोरीला गेला असल्याबाबत सतर्क केले होते, त्यानंतर त्यांनी भारतीय उच्चायुक्तांना याबाबत कळवले.

हे ही वाचा:

बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

इस्रायल-हमास दरम्यान युद्धविरामाचा प्रस्ताव सुरक्षा परिषदेत संमत!

‘भारताकडून नेहमीच सुरक्षा आणि शांततेला महत्त्व’

मलावीच्या उपराष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान बेपत्ता

भारत सरकारने तामिळनाडूमधील मंदिरातून चोरीला गेलेल्या ब्राँझ मूर्तीसाठी औपचारिक विनंती केली होती. आणि लिलावाद्वारे ब्रिटनच्या संग्रहालयात गेलेल्या या मूर्तीपर्यंत ते पोहोचले होते. जगातील सर्वात प्रसिद्ध कला आणि पुरातत्व कलाकृती असलेल्या या संग्रहालयाने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी १९६७मध्ये केवळ चांगल्या हेतूने ही मूर्ती विकत घेतली.

चोरीला गेलेल्या अनेक भारतीय कलाकृती ब्रिटनमधून भारतात परत आणल्या गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अगदी अलीकडेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आंध्र प्रदेशातून आलेले चुनखडीत कोरलेले आरामशिल्प आणि १७ व्या शतकातील तामिळनाडूमधील ‘नवनीथा कृष्णा’ ब्राँझ शिल्प स्कॉटलंड यार्डच्या कला आणि पुरातन वस्तू युनिटचा समावेश असलेल्या अमेरिका-ब्रिटनच्या तज्ज्ञांच्या संयुक्त तपासणीनंतर ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तांकडे सोपविण्यात आल होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा