30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
घरविशेषG-20 नंतर पाकिस्तानी नागरीक आपल्याच सत्ताधाऱ्यांना देऊ लागले दोष

G-20 नंतर पाकिस्तानी नागरीक आपल्याच सत्ताधाऱ्यांना देऊ लागले दोष

भारत, पश्चिम आशिया, युरोपमधील कॉरीडोरवरून धुसफूस

Google News Follow

Related

भारताने अध्यक्षपद भूषवलेली जी २० शिखर परिषद यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जगभरातून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या जागतिक स्तरावरील शिखर परिषदेत सहभागी झालेल्या जगभरातील नेत्यांनी भारताच्या पाहुणचाराचे आणि घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक केले.

जी २०ची ही परिषद भारतासाठीही महत्त्वाची ठरली. या परिषदेत भारत, पश्चिम आशिया आणि युरोपदरम्यान कॉरिडोर बनवण्यासंदर्भात महत्त्वाचा करार करण्यात आला. हा करार एकप्रकारे भारताने मिळवलेले मोठे यश असतानाच दुसरीकडे पाकिस्तानमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. जी २० परिषदेनंतरच पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या सरकारला दोष देण्यास सुरुवात केली आहे.

दिल्लीमध्ये झालेल्या जी २० शिखर परिषदेत भारत, पश्चिम आशिया आणि युरोप इकॉनॉमिक कॉरिडोरच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे आशिया, अरबी समुद्र आणि युरोपदरम्यान सागरी व्यापार आणि दळणवळणात वाढ होईल. या इकॉनॉमिक कॉरिडोरमध्ये भारत, यूएई, सौदी अरेबिया, युरोपियन युनियन, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिकेचा समावेश आहे.

भारत, पश्चिम आशिया आणि युरोप दरम्यान कॉरिडोर साकारण्यासंदर्भातील करार होत असल्याने पाकिस्तानचे नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. त्यांना स्वतःचीच लाज वाटू लागली आहे. पाकिस्तानी नागरिक याला धोक्याची घंटा मानू लागले आहेत. सोशल मीडियावरही पाकिस्तानच्या विरोधात संताप व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:

देवेगौडा येणार भाजपासोबत, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती

साताऱ्यात आक्षेपार्ह पोस्टवरून राडा; जाळपोळ, दगडफेकीच्या घटना

ठाण्यात ४०व्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली; ६ कामगार ठार

जळगावच्या भाषणात उद्धव ठाकरेंची जळजळ

‘इस्लामाबादमध्ये बसलेल्या धोरणकर्त्यांकडे थोडीशी जरी बुद्धी आणि जागरूकता असती तर ‘भारत, पश्चिम आशिया आणि युरोप कॉरिडॉर’ पाकिस्तानमधून गेला असता आणि आपणसुद्धा जागतिक पर्यटन आणि दळणवळणाचे केंद्र बनू शकलो असतो,’ अशी प्रतिक्रिया एका पाकिस्तानी नागरिकाने दिली आहे. तर, दुसऱ्या व्यक्तीने ‘आशियाई देशांना युरोपीय संघासह एकजूटता दाखवली पाहिजे. हेच आशियाई व्यक्तींच्या प्रगतीसाठी योग्य आहे.

आपण एकमेकांशी असलेली स्पर्धा संपवून एकजूट होण्याची गरज आहे,’ असे म्हटले आहे. तर, तिसऱ्या व्यक्तीने ही बाब लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. ‘मला आता स्वत:ला पाकिस्तानी नागरिक म्हणवून घ्यायला लाज वाटते आहे. आपल्या देशाला चांगले भवितव्य, नेतृत्व लाभणे गरजेचे आहे. आता बदल होण्याची वेळ आली आहे. तसेच, जे खरोखरच आपले प्रतिनिधीत्व करतात, अशाच जबाबदार व्यक्ती सत्तेत येणे गरजेचे आहे,’ अशी भावना एकाने व्यक्त केली आहे. आणखी एका पाकिस्तानी नागरिकाने भारताचे कौतुक केले आहे. ‘मला भारताबद्दल असूया वाटते आहे. पण हे यश भारताने स्वत:च्या हिकमतीच्या जोरावर मिळवले आहे,’ अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा