29 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरविशेषकानपूरमध्ये पाकिस्तानी एजंट, आयएसआयला देत होता गुप्त माहिती, एटीएसने केली अटक!

कानपूरमध्ये पाकिस्तानी एजंट, आयएसआयला देत होता गुप्त माहिती, एटीएसने केली अटक!

पाच दिवसात दुसरा एजंट ताब्यात

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश एटीएसने कानपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करणाऱ्या एका पाकिस्तानी एजंटला अटक केली आहे. कुमार विकास असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कुमार विकास हा आयएसआय एजंट नेहा शर्माच्या संपर्कात होता आणि तिला गुप्तचर माहिती पुरवत होता.

पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी काम करणारा हा दुसरा एजंट आहे, ज्याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एटीएसने फिरोजाबाद येथून रवींद्र कुमारला अटक केली होती. ज्यांच्या माहितीवरून कुमार विकासवर पाळत ठेवण्यात येत होती. विकासवर कानपूर ऑर्डनन्स फॅक्टरीची विविध कागदपत्रे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला लीक केल्याचा आरोप आहे. हे संपूर्ण प्रकरण देखील हनी ट्रॅपचे आहे.

होळीच्या एक दिवस आधी, हजरतपूर फिरोजाबाद येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या रवींद्र कुमारला एटीएस टीमने अटक केली होती. रवींद्र कुमारवर पाकिस्तानी एजंट नेहा शर्माच्या संपर्कात असल्याचा आणि ऑर्डनन्स फॅक्टरीची गोपनीय आणि महत्त्वाची कागदपत्रे शेअर केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेहा शर्मा पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी काम करत होती आणि तिने रवींद्र कुमारला हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते.

रवींद्र कुमारच्या अटकेनंतर एटीएसला माहिती मिळाली की कानपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करणारा कुमार विकास हा पाकिस्तानी एजंट नेहा शर्माशीही जोडला गेला आहे. कुमार विकास हा ऑर्डनन्स फॅक्टरीची गोपनीय माहिती आणि कागदपत्रे व्हॉट्सअॅपद्वारे पाकिस्तानी एजंट नेहा शर्माला पुरवत होता, असेही समोर आले. आरोपी कानपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ज्युनियर बॉक्स मॅनेजर म्हणून तैनात आहे. पाकिस्तानी एजंट फेसबुकद्वारे नेहा शर्माच्या संपर्कात आला होता.

हे ही वाचा : 

भारत १८ वर्षांनंतर एएफसी बीच सॉकर एशिया कपमध्ये ऐतिहासिक पुनरागमन करण्यास सज्ज

गोळी न चालवता ‘कलम ३७०’ हटवून जम्मू-कश्मीरचे देशात पूर्ण विलीनीकरण

कर्नाटका: महिलांना मोफत गोष्ट देता तर दारू पिणाऱ्याला दोन बाटल्या मोफत द्याव्या!

चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधारपदाची धुरा सुर्यकुमार यादवकडे

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी एजंट नेहा शर्माने स्वतःला ‘भारत हैवी इलेक्ट्रानिक लिमिटेड’मध्ये काम करत असल्याचे सांगितले आणि मोबाईल नंबर शेअर करत व्हॉट्सॲप आणि मेसेंजरवर संभाषण सुरू केले.  पाकिस्तानी एजंट नेहा शर्माशी गुप्तपणे संवाद साधण्यासाठी कुमार विकासने लुडो ॲपचा वापर करत होता.

पैशाच्या लोभापायी, आरोपी कुमार विकासने ऑर्डनन्स फॅक्टरीची कागदपत्रे, तयार होणारी उपकरणे आणि दारूगोळा, कानपूर कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रके, ऑर्डनन्स फॅक्टरीच्या कानपूरमधील मशीन्स आणि ऑर्डनन्स फॅक्टरीच्या उत्पादनाशी संबंधित चार्ट इत्यादी छायाचित्रे आणि महत्त्वाची माहिती पाकिस्तानी एजंट नेहा शर्माला पाठवत असे. दरम्यान, पथकाने आरोपीला कुमार विकासला अटक करून चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात आणखी कोणी आहे का? याचा तपास पथकाकडून करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा