28 C
Mumbai
Sunday, January 29, 2023
घरविशेषगोपीनाथ मुंडे यांची श्रीमंती पैसा, जमीन-जुमला सोन्या नाण्यात मोजता येणारी नव्हती

गोपीनाथ मुंडे यांची श्रीमंती पैसा, जमीन-जुमला सोन्या नाण्यात मोजता येणारी नव्हती

गोपीनाथ मुंडे जयंती

Google News Follow

Related

दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची जयंती दरवर्षी गोपीनाथ उत्साहात साजरी केली जाते. परंतु यावर्षी गोपीनाथ गडावर दरवर्षी सारखा कोणताही कार्यक्रम झाला नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी भगवान गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी देशातील महापुरुषांच्या अवमानप्रकारणी अर्धा तास मौन पळून निषेध नोंदवला.

बीडमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी मुंडे यांचे हजारो समर्थक मोठ्या संख्येने येत असतात. बऱ्याच जणांना गोपीनाथ गडावर जाणे शक्य होत नाही. त्यामुळे यावर्षी गोपीनाथ गडावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. यंदा गोपीनाथ मुंडे यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं होतं. महापुरुषांचा झालेला अपमान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, श्रद्धा वालकरची हत्या, अशा अनेक गंभीर घटनांचा प्रतिकात्मक निषेध म्हणून पंकजा मुंडे यांनी अर्धा तास मौन बाळगले होते.

मौन सोडल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. आठवणी सांगताना त्या काहीशा भावूक झालेल्या दिसल्या. गोपीनाथ मुंडे यांनी कायम लोकांच्या कल्याणासाठी काम केलं.ते श्रीमंत राजकारणी होते. त्यांची श्रीमंती पैसा, जमीन-जुमला किंवा सोन्या नाण्यात मोजता येणारी नव्हती. कारण त्यांनी सोन्याहून मौल्यवान गोष्ट कमावली, ती म्हणजे प्रेम करणारी हक्काची माणस. त्यांचा तोच वारसा मी पुढे चालवतेय. प्रेम करणाऱ्या माणसांमुळे मीही प्रचंड श्रीमंत आहे, असं पंकजा म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण

‘पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यामुळे समृद्धी महामार्ग’

‘मन की बात’ कार्यक्रमाचे पुस्तक छापण्यावरून लुबाडले

एका डेंटिस्टचे साखरपुड्याच्या दिवशी अपहरण

मी थकणार नाही. मी रूकणार नाही. कोणासमोर कधी झुकणार नाही. हा गोपीनाथ मुंडेचा ध्यास होता. त्याच मार्गाने मी पुढे जातेय. काही लोक पदासाठी लोकांच्या पुढे-पुढे करतात. पण माझ्या रक्तात ते नाही. कालही नव्हतं आजही नाही. महापुरूषांबाबत वाईट बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
2,002अनुयायीअनुकरण करा
61,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा